कार्यकारिणी औरंगाबादची; भरणा जालना मतदारसंघातील

By Admin | Updated: June 10, 2016 00:07 IST2016-06-09T23:57:30+5:302016-06-10T00:07:44+5:30

औरंगाबाद : भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

Executive of Aurangabad; Purna in Jalna constituency | कार्यकारिणी औरंगाबादची; भरणा जालना मतदारसंघातील

कार्यकारिणी औरंगाबादची; भरणा जालना मतदारसंघातील

औरंगाबाद : भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. २३ पदे फुलंब्री विधानसभा, तर जालना लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्यामुळे प्रदेशाध्यक्षांचा व विधानसभा अध्यक्षांचा यादीवर मोठा प्रभाव असल्याचे दिसते. पक्षामध्ये एकतर्फी कारभार चालू असल्याच्या प्रतिक्रिया जुन्या पदाधिकाऱ्यांमधून उमटल्या. विरोध करणारे कुणी नसल्यामुळे हे सगळे घडत असून, आगामी काळात शिवसेनेविरोधात औरंगाबाद विधानसभा लढायची असेल तर संघटना कशी बांधायची, असाही सवाल काहींनी लोकमतशी बोलताना केला. शहर कार्यकारिणीमुळे नाराजीचा सूर उमटत असताना जिल्हा कार्यकारिणीदेखील एकतर्फी झाल्याने पक्षात आगामी काळात याचे पडसाद उमटतील, असे दिसते.
यामध्ये जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी विजय औताडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी विजया गव्हाणे, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी रूपचंद साळवे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दत्ता धुमाळ, भटक्या व विमुक्त जमाती जिल्हाध्यक्षपदी गोपीनाथ वाघ, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्षपदी डॉ.जब्बार पटेल, सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी काकासाहेब तायडे यांची निवड झाली आहे. ४२ सदस्यांच्या कार्यकारिणीमध्ये १२ जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहेत. तर ९ चिटणीसांचा समावेश आहेत. ४ सरचिटणीसांमध्ये सुहास शिरसाट, रघुनाथ काळे, किशोर धनायत, लक्ष्मण औटी यांचा समावेश आहे. ८ उपाध्यक्षांमध्ये साहेबराव डिघुळे, सजनराव मते, दिलीप दाणेकर, मंगल वाहेगावकर, राजेंद्र जैस्वाल, संजय खंबायते, सांडू जाधव, ज्ञानेश्वर जगताप यांचा समावेश आहे. पूर्ण कार्यकारिणीत ३ महिलांना स्थान मिळाले आहे. २०१८ पर्यंत ही कार्यकारिणी असणार आहे. याप्रकरणी जिल्हाप्रमुख जाधव यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
शहर कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या सर्वांना पदे वाटली. तसा प्रकार जिल्हा कार्यकारिणीमध्ये तुरळक असला तरी युवा मोर्चाचे प्रमुखपद राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नगरसेवक विजय औताडे यांना दिल्यामुळे अंतर्गत खदखद उफाळण्याचे संकेत आहेत.
भाजपने सिल्लोड, फुलंब्री, पैठण या तीन तालुक्यांमधील २३ पदाधिकारी घेतले आहेत. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघाचा मोठा भरणा यादीमध्ये आहे. उर्वरित वैजापूर, औरंगाबाद, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, सोयगाव या तालुक्यातील कार्यकर्त्यांना १९ पदे देण्यात आली आहेत.

Web Title: Executive of Aurangabad; Purna in Jalna constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.