अस्मानी संकटातून केवळ लष्करामुळे सुटका
By Admin | Updated: September 12, 2014 00:32 IST2014-09-12T00:20:31+5:302014-09-12T00:32:29+5:30
औरंगाबाद : वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या शहरातील आठ भाविकांची लष्कराने सुखरूप सुटका केली.

अस्मानी संकटातून केवळ लष्करामुळे सुटका
बालाजी आडसूळ, कळंब
दोन वर्षापासून कळंब पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे प्रलंबित असलेली महाग्रारोहयोमधील पशुधन निवाऱ्याची कामे अखेर मार्गी लागली असून पंचायत समिती स्तरावर प्रति पाच याप्रमाणे ८२ ग्रामपंचायतीच्या ४१० कामांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी १६० कामे प्रत्यक्षात प्रगतीपथावर आहेत. पं. स. प्रशासनाला उशिरा का होईना जाग येऊन मुक्या जनावरांना हक्काचा सुस्थितीत निवारा देणारी ही कामे मार्गी लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान होत आहे.
केंद्र शासनाने ४ मे २०१२ रोजी एक मार्गदर्शक सूचना काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांच्या काही वैयक्तिक लाभाची काही कामे हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या नियोजन विभागाने महाग्रारोहयोतून करावयाच्या अनुज्ञेय कामात पशुधन निवारा, कुक्कुट व शेळी पालन शेड, अमृतपाणी खड्डा, नॅडॅप आदी २९ महत्वपूर्ण कामांचा समावेश केला होता.
शेतीसाठी तसेच दुग्धव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात पशुधन जोपासण्यात येते. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांकडे पक्क्या निवाऱ्याची वाणवा होती. त्या अनुषंगाने तालुक्यातून ३३९८ इतक्या विक्रमी संख्येने कळंब पं. स. कडे पशुधन निवाऱ्याचे प्रस्ताव आले होते. परंतु दोन वर्षात या प्रस्तावाला दफ्तर दिरंगाईचा फटका बसून साधी प्रशासकीय अथवा तांत्रिक मान्यताही न मिळाल्याने संबंधित शेतकरी परेशान झाले होते.
या संदर्भात लोकमतमधून आवाज उठविण्यात आला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन केले होते. त्यानंतर मागील काही दिवसात तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या ४१० प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामाच्या प्रस्तावावरील अखेर धूळ झटकल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
१६० कामे प्रगतीपथावर
४प्रस्तावाची गावनिहाय संख्या मोठी असल्याने प्रति ग्रामपंचायत पाच याप्रमाणे पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून पंधरा दिवसात ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार तालुक्यातील विविध गावात पालक तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली १६० पशुधन निवाऱ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
काही शेतकऱ्यांच्या पशुधन निवाऱ्याची कामे पूर्णत्वास आली असून या कामामुळे मुक्या जनावरांना बसण्यासाठी सिमेंट कॉक्रीट असलेला भुभाग समोर ऊन पावसापासून संरक्षण करणारी बारा फूट उंचीची विटाची भिंत, चारा खाण्यासाठी गव्हाण, पाण्याचा व मलमुत्राचा निचरा होईल, असा उतार व विल्हेवाटीची सोय वरतून स्टेनलेस स्टिलच्या पत्र्याचा छत असा पद्धतशीर आखीव, रेखीव स्वच्छ व खेळती हवा लाभलेला पक्का गोठा मिळाला आहे. यासाठी नवीन तांत्रिक व आर्थिक मापदंडानुसार प्रती गोठ्यास सत्तर हजाराच्या आसपास महाग्रारोहयो या योजनेतून खर्च केला जात आहे.