शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

थ्री स्टार, फाइव्ह स्टार, हाॅटेल्सना गंडवणारा अडकला; महागड्या दारू, सिगारेटचा आस्वाद घेऊन व्हायचा फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 12:15 PM

ठकसेनाला वेदांतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देफाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये कॉन्फरन्सचा बहाणा करून रूम बुक करत असे महागड्या दारू, सिगारेटचा आस्वाद घेणाऱ्या ठकसेनाला बेड्या

औरंगाबाद : महागड्या हॉटेलमध्ये कॉन्फरन्स घेण्याच्या बहाण्याने थांबून गंडा घालणाऱ्या एकाला वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भीमसेंट जॉन असे ताब्यात घेतलेल्या ठकबाजाचे नाव आहे. 

ही व्यक्ती किज हॉटेल येथे दोन दिवसांपासून थांबली असून, तिच्या हालचाली संशयास्पद दिसत असल्याने हॉटेल मालक चौधरी यांनी वेदांतनगर ठाण्यात माहिती दिली. पाळत ठेवून माहिती घेतली असता त्याच्यावर पोलीस स्टेशन कफपरेड, मनिपाल, धारवाड, ओल्ड गोवा, येथे हाॅटेलमध्ये थांबून महागडी दारू, सिगारेट व इतर पदार्थ ऑर्डर करणे व बिल न देता, रूम चेक आऊट न करताच फरार होणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याने याच प्रकारे औरंगाबादेतही वेगवेगळ्या नावाने हॉटेल रामा इंटरनॅशनल, ॲम्बेसिडर या हॉटेलला फसविल्याचे समोर आले. 

आकर्षक व्याजाचे आमिष देऊन १ कोटीची फसवणूक; आरोपीस पुण्यात केली अटक

किज्‌ हाॅटेल येथेही विश्वास बसावा म्हणून त्याने ॲग्रिकल्चर कॉन्फरन्स असल्याचे सांगितले व डिपॉझिट दिले नाही, तसेच रूममध्ये राहून महागड्या २० ते २५ सिगारेट मागविल्या. महागडी दारू मागविली असता त्याचा संशय आला. त्यानंतर त्याला डिपाॅझिट जमा करण्यास सांगितले, त्यावेळी त्याने पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे व्यवस्थापकाला अधिक संशय आला.

आधारकार्डने संशयाला मिळाला दुजोरा...आधारकार्ड इंटरनेटवर चेक केल्यानंतर संशयास पुष्टी मिळाल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. या प्रकरणात आरोपीने ६ ते ७ वेगवेगळी नावे वापरून अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला ताब्यात घेतलेथ्री स्टार, फाइव्ह स्टार, हाॅटेल्सना गंडा घालणाऱ्या ठगास वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. २०१०, १२ साली हाॅटेल रामा इंटरनॅशनल, लेमन ट्री, अजंटा ॲम्बेसिडरला गंडविले होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद