पहिल्याच नगरपंचायतींसाठी तरूणांत उत्साह!

By Admin | Updated: November 2, 2015 00:15 IST2015-11-02T00:08:07+5:302015-11-02T00:15:49+5:30

जालना : जिल्ह्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जाफराबाद, मंठा, बदनापूर आणि घनसावंगी नगर पंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले.

Excited enthusiasm for the first municipal council! | पहिल्याच नगरपंचायतींसाठी तरूणांत उत्साह!

पहिल्याच नगरपंचायतींसाठी तरूणांत उत्साह!


जालना : जिल्ह्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जाफराबाद, मंठा, बदनापूर आणि घनसावंगी नगर पंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच स्थानिक आघाड्यांनी या चारही नगरपंचायतींमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो आणि इतिहास कोण घडवितो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एकूणच या निवडणुकीत तरुणांमध्ये अपूर्व उत्साह दिसून आला. मंठा, जाफराबाद, बदनापूर आणि घनसावंगी या नगरपंचायतीतील एकूण ४१६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात मंद झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
घनसावंगी: घनसावंगी नगर पंचायतीसाठी ५५०० मतदारांपैकी ४४४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी १७ वॉर्डांसाठी ६१ उमेदवार निवडणूक रिंंगणात होते. रविवारी त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
वार्ड क्रमांक १ मध्ये १३२, वॉर्ड क्रं.२ मध्ये १५५, वॉर्ड क्रं. ३ मध्ये २५७, वॉर्र्ड क्र. ४ मध्ये २३५, वार्ड क्रमांक ५ मध्ये २६०, वॉर्ड क्रमांक ६ मध्ये २९६, वॉर्ड क्रमांक ७ मध्ये २५८, वॉर्ड क्रमांक ८ मध्ये ३१५, वॉर्ड क्रमांक ९ मध्ये ३४०, वॉर्ड क्रमांक १० मध्ये ३४५, वॉर्ड क्रमांक ११ मध्ये २८२, वॉर्ड क्रमांक १२ मध्ये २७७, वॉर्ड क्रमांक १३ मध्ये १३५, वॉर्ड क्रमांक १४ मध्ये १८७, वॉर्ड क्रमांक १५ मध्ये २७०, वॉर्ड क्रमांक १६ मध्ये २७५, वॉर्ड क्रमांक १७ मध्ये २२९, वॉर्ड क्रमांक १८ मध्ये १९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
आहे. एकूण २१३० महिला व २३१६ पुरूष असे एकुण ४४४६ मतदारांनी म्हणजे ८०.२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जाफराबाद: येथील नगर पंचायत निवडणुकीसाठी १७ जागांकरीता ८५ उमेदवार निवडणूक रिंग्ांणात होते. रविवारी झालेल्या मतदानात १०९०७ मतदारांपैकी ९०२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळपासूनच प्रत्येक वार्डात मतदारांनी मतदानासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता. वार्ड क्रमांक १ मध्ये ८२१ पैकी ५६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच वार्ड क्रमांक २ मध्ये ८५८ पैकी ६४९, वार्ड क्रमांक ३ मध्ये ७५६ पैकी ६४६, वार्ड क्रमांक ४ मध्ये ५२८ पैकी ४१७, वार्ड क्रमांक ५ मध्ये ८१७ पैकी ६५९, वार्ड क्रमांक ६ मध्ये ७६१ पैकी ६११, वार्ड क्रमांक ७ मध्ये ५६१ पैकी ४६३, वार्ड क्रमांक ८ मध्ये ५१० पैकी ४५०, वार्ड क्रमांक ९ मध्ये ७४९ पैकी ६७८, वार्ड क्रमांक १० मध्ये ७५६ पैकी ६६१, वार्ड क्रमांक ११ मध्ये ६०७ पैकी ५१३, वार्ड क्रमांक १२ मध्ये ६४३ पैकी ५४६, वार्ड क्रमांक १३ मध्ये ६६६ पैकी ५६५, वार्ड क्रमांक १४ मध्ये ४९६ पैकी ४०२, वार्ड क्रमांक १५ मध्ये ५६५ पैकी ५१५, वार्ड क्रमांक १६ मध्ये ४३३ पैकी ३५२, वार्ड क्रमांक १७ मध्ये ३८१ पैकी ३३७ मतदारांनी मतदनाचा हक्क बजावला आहे.
४मंठा : नवनिर्वाचित नगर पंचायतसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीसाठी १७ प्रभागामध्यें ६९.४१ टक्के मतदान झाले १६ हजार २६१ मतदारांपैकी ११ हजार २८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत नागरिकांनी उत्साहात मतदान केले. ७४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
४मंठा नगर पंचायत सर्वच राजकीय पक्षानी प्रतिष्ठेची केली होती. भाजपाचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, माजी जि.प. उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भाऊसाहेब कदम, गणेश खवणे, अंकुशराव अवचार, बाबुराव शहाणे, इसामोद्दीन पटेल, गणेश बोराडे तर शिवसेनेसाठी जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, प्रल्हाद बोराडे, प्रसाद बोराडे, नितीन राठोड, संतोष वरकड, सभापती उर्मिला सरोदे, सुरेश सरोदे, प्रदीप बोराडे, सचिन बोराडे, कैलास बोराडे, श्रीरंगराव खरात, काँग्रेससाठी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, धोंडीराम राठोड, अ‍ॅड. अन्वर देशमुख, संदीप गोरे, राजेश राठोडे, कलंदरखा पठाण आदींनी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पंकज बोराडे, शरद बोराडे, अशोक खरात आदींनी प्रयत्न केले.
४नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर पंचायत निवडणुकीसाठी तरूणांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखविला. वयोवृद्धांना हाताला धरून आणून त्यांच्याकडून मतदान करून घेतले. तर काही ठिकाणी रांगा लागलेल्या दिसत होत्या.
बदनापूर : बदनापूर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत ८०़११ टक्के मतदान झाले असून, मतदारांनी उत्साहात व भरभरून मतदान केले.
बदनापूर नगरपंचायतीच्या सतरा प्रभागांतून सतरा जागांसाठी हे मतदान झाले असून, ८५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. या नगरपंचायतसाठी सकाळी संथगतीने सुरूवात झाली मात्र नंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती . येथील सतरा मतदान केंद्रांवर सकाळी ७़३० ते ९़३० पर्यंत ४़४६ टक्के,९़३० ते ११़३० पर्यंंत ३५़९७ टक्के,११़३० ते १़३० पर्यंत ६०़४६ टक्के,१़३० ते ३़३० पर्यंत ७१़१२ टक्के, ३़३० ते ५़३० पर्यंत ८०़११ टक्के मतदान झाले येथील नगरपंचायतमधे एकुण ९५८४ मतदार असून, त्यामध्ये एकूण महिला ४४९२ पैकी ३५६४ व एकूण पुरूष ५०९२ पैकी ४११४ अशा एकूण ७६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वॉर्डनिहाय मतदान पुढीलप्रमाणे आहे. वॉर्ड क्रं. १ मध्ये स्त्री २४६ पैकी २०३ व पुरूष ३३५ पैकी २३५ एकूण ५७९ पैकी ४३८ मतदान ७५़६२ टक्के,वॉर्ड क्र २ मध्ये स्त्री २४९ पैकी १९५ व पुरूष २५८ पैकी २४९ एकूण ५०७ पैकी ४४४ मतदान ८७़५७ टक्के,वॉर्ड क्र ३ मध्ये स्त्री २७८ पैकी २३३ व पुरूष २८३ पैकी २५७ एकूण ५६१ पैकी ४९० मतदान ८७़३४ टक्के,वॉर्ड क्र ४ मधे स्त्री २९६ पैकी २२७ पुरूष ३१४ पैकी २५७ एकूण ६१० पैकी ४८४ मतदान ७९़३४ टक्के,वॉर्ड क्र ५ मधे स्त्री ३४४ पैकी २६१ व पुरूष ४१६ पैकी ३२४ एकूण ७६० पैकी ५८५ मतदान ७६़९७ टक्के,वॉर्ड क्र ६ मध्ये स्त्री ३१३ पैकी २५८ व पुरूष ३७५ पैकी ३११ एकूण ६८८ पैकी ५६९ मतदान ८२़७० टक्के ,वॉर्ड क्र ७ मधे स्त्री ४३२ पैकी ३०६ व पुरूष ४५९ पैकी ३५३ असे एकूण ८९१ पैकी ६५९ मतदान ७३़९६ टक्के,वॉर्ड क्र ८ मध्ये स्त्री ३८६ पैकी २८६ पुरूष ४१६ पैकी ३१७ एकूण ८०२ पैकी ६०३ मतदान ७५़६२ टक्के ,वॉर्ड क्र ९ मध्ये स्त्री २३९ पैकी १७३ पुरूष ३३१ पैकी २८६ एकुण ५७० पैकी ४५९ मतदान ८०़५२ टक्के, वॉर्ड क्र १० मधे स्त्री १४९ पैकी १३० पुरूष १६८ पैकी १३४ एकुण ३१७ पैकी २६४ मतदान ८३़२८ टक्के,वॉर्ड क्र ११ मधे स्त्री १८८ पैकी १४८ पुरूष २५१ पैकी १९७ एकूण ४३९ पैकी ३४५ मतदान ७८़४० टक्के,वॉर्ड क्र १२ मध्ये स्त्री २३९ पैकी २०८ पुरूष २५३ पैकी २१३ एकूण ४९२ पैकी ४२१ मतदान ८५़५६ टक्के,वॉर्ड क्र १३ मध्ये १३९ स्त्री पैकी ११३ पुरूष १५९ पैकी १२८ एकुण २९८ पैकी २४१ मतदान ८०़८७ टक्के,वॉर्ड क्र १४ मध्ये स्त्री १९० पैकी १३३ पुरूष १७८ पैकी १३१ एकूण ३६८ पैकी २६४ मतदान ७१़७३ टक्के,वार्ड क्र १५ मध्ये स्त्री २३३ पैकी २११ पुरूष २७६ पैकी २३१ एकूण ५०९ पैकी ४४२ मतदान ८६़८३ टक्के,वॉर्ड क्र १६ मध्ये स्त्री ३६९ पैकी ३०६ पुरूष ३८४ पैकी ३१४ एकूण ७५३ पैकी ६२० मतदान ८२़३३ टक्के ,वॉर्ड क्र १७ मध्ये स्त्री २०१ पैकी १६५,पुरूष २३५ पैकी १८५ एकूण ४३६ पैकी ३५० मतदान ८० टक्के झाले

Web Title: Excited enthusiasm for the first municipal council!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.