गणतंत्रदिनी विक्रीसाठी आणलेला दारूसाठा उत्पादन शुल्क विभागाने पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:15+5:302021-02-05T04:21:15+5:30
अंकेश कुंदनलाल जयस्वाल (रा. अंबर हिल, जटवाडा रोड) असे आरोपीचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्तीवर असताना ...

गणतंत्रदिनी विक्रीसाठी आणलेला दारूसाठा उत्पादन शुल्क विभागाने पकडला
अंकेश कुंदनलाल जयस्वाल (रा. अंबर हिल, जटवाडा रोड) असे आरोपीचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्तीवर असताना एका कारमधून जळगाव रोडकडून मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने दारू साठा नेला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. निरीक्षक ए.जे. कुरेशी, दुय्यम निरीक्षक गणेश नागवे, आनंद शेंदरकर, प्रवीण पुरी, अनिल जायभाये, अशोक कोतकर यांनी जळगाव रोडवर संशयित कारचा पाठलाग सुरू केला. वसंतराव नाईक चौकातून कारचालक मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाऊ लागताच पथकाने त्याची कार पकडली. झडती घेतली असता कारमध्ये लपवून ठेवलेले देशी दारूचे १३ बॉक्स आढळून आले. ३२ हजार ४४८ रुपयांचा दारू साठा आणि ९० हजारांची कार जप्त करण्यात आली. आरोपी अंकेश जयस्वालला अटक करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली. (फोटोसह )