शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

मराठवाड्यातील पिकांना पावसाचा पुन्हा फटका; सात मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 1:46 PM

Excessive rainfall in seven circles in Marathwada परतीच्या पावसाची सर्वदूर हजेरी

ठळक मुद्देवीज पडून एक ठारजलसाठे तुडुंब

औरंगाबाद/नांदेड/परभणी/ उस्मानाबाद/लातूर/बीड : मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांत परभणी व नांदेड जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. अन्यत्र पावसाचा जोर कमी असला तरी पिकांचे नुकसान सुरूच आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा काही भागांत अतिवृष्टी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नांदेड जिल्ह्यात एक तरुण पैनगंगेत वाहून गेल्याने मरण पावला. नांदेड जिल्ह्यातील एक व परभणी जिल्ह्यातील ६ मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील नागर जवळा (ता. मानवत) येथे सोमवारी दुपारी ३ वाजता शेतात वीज पडून गोरक्ष बालाजी रासवे (१७) हा तरुण ठार झाला. 

परभणी जिल्ह्यातील सहा मंडळांमध्ये रविवारी रात्री अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. पाथरी तालुक्यातील बाबळगाव मंडळात ७७ मि.मी. कासापुरी मंडळात ७४ मि.मी., जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळात ७४ मि.मी., चारठाणा मंडळात ७५ मि.मी. आणि वाघी धानोरा मंडळात ६६ मि.मी. पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळातही ६६.८ मि.मी. पाऊस झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा सर्वदूर विक्रमी पाऊस पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर दिसत असल्याने मका आणि कापसाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील वैजापूर, पैठण, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, सोयगाव तालुक्यातील बहुतांश गावात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे़ मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत़ कळंब तालुक्यात सर्वाधिक ३८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ तसेच तुळजापूर, परंडा, भूम तालुक्यातही चांगला पाऊस झाला़ उस्मानाबाद शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली़  नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा महसूल मंडळात सोमवारी सकाळी ८३.२५  मि.मी. ची अतिवृष्टी झाली. हदगाव, भोकर, किनवट, लोहा, उमरी तालुक्यातही सरी कोसळल्या. बीड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले.

पैनगंगेत वाहून गेल्याने शेतमजुराचा मृत्यूमांडवी (जि. नांदेड) : येथील सचिन नरेंद्र चव्हाण या शेतमजुराचा शेतातून घरी परत येताना पैनगंगा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला. जिल्ह्यातील खंबाळा येथील या २३ वर्षीय शेतमजूर तरुणाचा मृतदेह विदर्भातील राजापेठ शिवारात मच्छीमारी करणाऱ्यांना सोमवारी सापडला. त्यानंतर हा मृतदेह खंबाळा येथे आणण्यात आला. किनवटचे तहसीलदार उत्तमराव कागणे यांनी खंबाळा येथे भेट देऊन पाहणी केली.

मांजरा प्रकल्पात ७२.७२ टक्के पाणीसाठालातूर शहर व जिल्ह्यात सोमवारी दमदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरूआहे.  लातूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या १ जूनपासून पाण्याचा येवा सुरू आहे. सोमवारी प्रकल्पात ७२.७२ टक्के पाणीसाठा झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, लातूरसह केज, अंबाजोगाई, धारूर, लातूर एमआयडीसी, औसा एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे. शिरूर अनंतपाळ, औसा, निलंगा तालुक्यांत चांगला पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेती