शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कापूस खरेदी केंद्रावरही जाचक अटी

By admin | Updated: December 18, 2014 00:38 IST

भाऊसाहेब गाडे , शिराळ आष्टी तालुक्यातून आष्टी आणि चोभा निमगाव येथील जिनिंगवर सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र कापूस खरेदी केंद्रावर कापूस

भाऊसाहेब गाडे , शिराळआष्टी तालुक्यातून आष्टी आणि चोभा निमगाव येथील जिनिंगवर सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा असणे ही अट असल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी कापूस खरेदी केंद्रापेक्षा व्यापाऱ्यांकडेच कापूस घालण्यास आपला कल वाढविला आहे.येथील सरकारी जिनिंगवर शासनाने प्रतिक्विंटल कापसाला ४ हजार ५० रुपये भाव देऊन सुद्धा तालुक्यातील शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांकडे ४ हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे कापूस विक्री करताना दिसत आहे. शेतकऱ्यांना सरकारी कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करताना सातबारा उतारा व प्रमाणपत्राची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सातबारा उतारा घेण्यासाठी व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. तर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.यंदा दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसला आहे. यातच सातबारा उतारा व प्रमाणपत्रासाठीही तलाठ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यातूनही जिंिनंगवर कापूस घेऊन गेल्यावर वाहनधारकांना वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिक घ्यावी लागत आहे. त्यामुळे वाहनधारकही सरकारी खरेदी केंद्रावर वाहतूक करण्यास नकार देत आहेत.सरकारी खरेदी केंद्रात सुविधांपेक्षा अडचणीच जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी सरधोपट मार्ग निवडला. व्यापाऱ्यांकडेच कापसाची विक्री करण्यास सुरूवात केली आहे. वाहनधारकांना मिळते कमिशनखाजगी व्यापारी शेतकरी शेतकऱ्यांना कापूस विक्री केल्यानंतर रोख पैसे देतात. तसेच वाहनधारकांनाही कापूस आणल्याबद्दल कमिशन दिले जाते. त्यामुळे वाहनधारकही सरकारी जिनिंगवर जाण्यास टाळाटाळ करतात. व्यापाऱ्यांकडून रोख स्वरूपात पैसे दिले जात असल्यामुळे व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जातेगाव येथील कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून केवळ १२०० क्विंटल कापूस खरेदी झाला असल्याचे ग्रेडर एस.एस. पाटील यांनी सांगितले.