एक तास उशिराने आरोग्य सेवकांची ‘परीक्षा’

By Admin | Updated: November 25, 2015 23:20 IST2015-11-25T23:10:31+5:302015-11-25T23:20:46+5:30

लातूर : लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती सुरू करण्यात आली असून, बुधवारी दुपारच्या सत्रात आरोग्य सेवकांसाठीचा पेपर एक तास उशिराने सुरू झाला.

An examination of health workers for one hour. | एक तास उशिराने आरोग्य सेवकांची ‘परीक्षा’

एक तास उशिराने आरोग्य सेवकांची ‘परीक्षा’


लातूर : लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती सुरू करण्यात आली असून, बुधवारी दुपारच्या सत्रात आरोग्य सेवकांसाठीचा पेपर एक तास उशिराने सुरू झाला. ७ केंद्रांवर ४६१ उमेदवार उपस्थित होते. तर १५४ उमेदवार गैरहजर होते.
लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांची जाहिरात देऊन पदभरतीसाठी आवेदनपत्र भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार औषध निर्माण अधिकाऱ्याच्या एका पदासाठी ३२ अर्ज आले होते. यातील २१ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ११ विद्यार्थी अनुपस्थित होते. वरिष्ठ सहाय्यक लेखाच्या एका पदाकरिता १०९ पात्र अर्ज प्राप्त झाले. यातील ८१ उमेदवारांनी परीक्षा दिली. २८ उमेदवार गैरहजर होते. कृषी अधिकारी या एका पदासाठी ३४ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. चार उमेदवार गैरहजर होते. आरोग्य सेवक पुरुष ८ पदांसाठी ४४ अर्ज प्राप्त झाले होते. २५ उमेदवारांनी परीक्षा दिली. १९ गैरहजर होते. आरोग्य सेवक महिलांच्या ८ पदांसाठी १६२ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ११० उमेदवारांनी परीक्षा दिली. ५२ उमेदवार गैरहजर होते. पर्यवेक्षिका या एका पदासाठी ७५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५६ उमेदवारांनी परीक्षा दिली. १९ उमेदवार गैरहजर होते. विस्तार अधिकारी कृषी एका जागेसाठी १७० अर्ज प्राप्त झाले. यातील १३८ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३२ उमेदवार गैरहजर होते.
७ संवर्गासाठी एकूण ४६१ उमेदवारांनी शहरातील सात परीक्षा केंद्रांवर सकाळी १० ते ११.३० तर काही केंद्रांवर दुपारी २ ते ३.३० या वेळेत परीक्षा दिली. परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या १५० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा सकाळी ८ वाजेपासून हजर होता. या परीक्षा दुपारी ४ पर्यंत शांततेत पार पडल्या. (प्रतिनिधी)

Web Title: An examination of health workers for one hour.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.