औरंगाबाद शहरात शनिवारी होणार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन
By Admin | Updated: August 21, 2014 00:12 IST2014-08-20T23:58:08+5:302014-08-21T00:12:00+5:30
औरंगाबाद : लोकमतने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मालिकेचा भाग म्हणून औरंगाबाद शहरात २३ आॅगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन होत आहे.

औरंगाबाद शहरात शनिवारी होणार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन
औरंगाबाद : लोकमतने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मालिकेचा भाग म्हणून औरंगाबाद शहरात २३ आॅगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन होत आहे.
सिडकोच्या एन-५ मधील जगद्गुरू संत तुकोबाराय नाट्यगृहात दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत तीन सत्रांमध्ये हे संमेलन होईल. पहिल्या सत्रात स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे लेखक तथा प्रख्यात मार्गदर्शक प्रा. तुकाराम जाधव हे ‘एमपीएससी अभ्यास व काळजी’ हा विषय मांडतील. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांचे एमपीएससी निवड प्रक्रियेवर मार्गदर्शन होईल. तसेच ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली स्पर्धा परीक्षा अॅटिट्युड व अॅप्टिट्युड या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. विशेष म्हणजे शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवडक लिखित प्रश्नांना तज्ज्ञ मार्गदर्शक उत्तरेही देतील.
संमेलन निर्धारित वेळेवर सुरू होणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम आसन आहे.
तसेच प्रवेश सर्वांसाठी खुला असून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी शनिवारी दुपारी ३.३० वाजता सिडकोतील नाट्यगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे लेखक तुकाराम जाधव तसेच ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली करणार मार्गदर्शन.