अभियांत्रिकीच्या परीक्षा २ जूनपासून

By Admin | Updated: May 27, 2014 01:22 IST2014-05-27T01:07:43+5:302014-05-27T01:22:00+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे २७ मेपासून घेण्यात येणार्‍या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Examination of engineering from June 2 | अभियांत्रिकीच्या परीक्षा २ जूनपासून

अभियांत्रिकीच्या परीक्षा २ जूनपासून

 औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे २७ मेपासून घेण्यात येणार्‍या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २ जूनपासून, तर पदव्युत्तरच्या १० जूनपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील सुमारे ४० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्ष, आर्किटेक्चर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि अंतिम वर्ष, फार्मसी शाखेच्या प्रथम ते चतुर्थ वर्ष तसेच बी. टेकच्या प्रथम ते चतुर्थ वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षा २७ मेपासून आयोजित करण्यात आल्या होत्या. या परीक्षेचे वेळापत्रक सर्वच महाविद्यालयांना पाठविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीही परीक्षेची जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कुलगुरूंच्या आदेशाने परीक्षेच्या एक दिवसआधी वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला. विद्यापीठ परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांनी याविषयी कळविले की, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी आणि बी. टेक़ अभ्यासक्रमांच्या परीक्षा २ जूनपासून होणार आहेत. पदव्युत्तरचे सुमारे ३ हजार विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमांसाठी सुमारे ४० हजार विद्यार्थी बसलेले आहेत. तर अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (एम.ई.) सुमारे ३ हजार विद्यार्थी बसले आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षांना १० जूनपासून प्रारंभ होणार आहे. विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले आहे.

Web Title: Examination of engineering from June 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.