८ जागांसाठी ४४५ उमेदवारांची परीक्षा
By Admin | Updated: November 16, 2014 23:38 IST2014-11-16T23:27:44+5:302014-11-16T23:38:38+5:30
लातूर : जिल्हा निवड समितीच्या वतीने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या नियंत्रणाखाली रविवारी घेण्यात आली़ पशुधन पर्यवेक्षक रिक्त पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली.

८ जागांसाठी ४४५ उमेदवारांची परीक्षा
लातूर : जिल्हा निवड समितीच्या वतीने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या नियंत्रणाखाली रविवारी घेण्यात आली़ पशुधन पर्यवेक्षक रिक्त पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली. रिक्त आठ जागांसाठी ४४५ जणांनी परीक्षा दिली. तर २६७ गैरहजर राहिले. यातील एक पद अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी रिक्त आहे.
जिल्हा पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षक सात व अंशकालीन एक या प्रमाणात आठ जागेसाठी ७१२ अर्ज दाखल करण्यात आले होते़ या पदासाठी दयानंद कला व कॉमर्स महाविद्यालयात रविवारी दहा ते साडेअकरा या दीड तासाच्या कालावधीत परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते़ सदरील परीक्षा जिल्हा निवड समितीने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ लक्ष्मण पवार यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आल्या होत्या़ यामध्ये एकूण ७१२ उमेदवरापैकी ४४५ उमेदवारांनी पशुधन पर्यवेक्षक पदासाठी परीक्षा दिली. (प्रतिनिधी)