जिल्ह्यातील १२ बालगृहांची तपासणी
By Admin | Updated: August 6, 2015 00:04 IST2015-08-05T23:46:49+5:302015-08-06T00:04:24+5:30
जालना : महसूल विभागाच्या विशेष पथकाकडून जिल्ह्यातील बालगृहांची तपासणी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी अंबड, घनसावंगी, मंठा, बदनापूर तालुक्यातील बालगृहांची तपासणी बीड येथील महसूल पथकाने केली.

जिल्ह्यातील १२ बालगृहांची तपासणी
जालना : महसूल विभागाच्या विशेष पथकाकडून जिल्ह्यातील बालगृहांची तपासणी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी अंबड, घनसावंगी, मंठा, बदनापूर तालुक्यातील बालगृहांची तपासणी बीड येथील महसूल पथकाने केली.
जिल्ह्यात विविध संस्थांकडून बालगृहे चालविली जातात. मात्र यात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत नेहमीच तक्रारी असतात. बालगृहात मिळणाऱ्या सुविधांची तपासणीकरिता महसूल विभागाचे विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी बीड येथून आलेल्या विशेष पथकाने वरील तालुक्यातील १२ बालगृहांची पाहणी करुन तेथील मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. शासकीय निकषाप्रमाणे येथे विद्यार्थ्यांना सोयी- सुविधा मिळतात का, बालगृहाच्या इमारतीसह इतर बाबींच्या नोंदी या पथकाने घेतल्या. महिला व बाल विकास अधिकारी इंगळे म्हणाल्या, बीड येथील विशेष पथकाने या बालगृहांची तपासणी केली. या तपासणीत काय नोंदी झाल्या हे गोपनीय आहे. हे पथक तपासणी केलेला अहवाल शासनाकडे पाठविणार आहे. (प्रतिनिधी)