शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 18:03 IST

Uday Samant: आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेतला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे महाविद्यालये उघडण्याचा निर्णय घेतला असून, परीक्षाही पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेतल्या जातील (Exam as before 'offline'). ‘ऑनलाईन’च्या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर निघावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ औरंगाबाद’ हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, या विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आमदार अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण अभय वाघ, सहसचिव दत्तात्रय कहार, सहसचिव डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. महेश शिवणकर, मंत्रालयातील कक्ष अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सामंत म्हणाले, आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे. पारंपरिक अध्यापन-अध्ययन झाले पाहिजे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडला पाहिजे. यासाठी महाविद्यालये व विद्यापीठ विभागात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे. यामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ज्यांनी लसीकरण केलेले नसेल, त्यांच्या संदर्भात कुलगुरुंनी निर्णय घेतला पाहिजे. संतपीठात ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विद्यापीठाचे हे संतपीठ देशातील अग्रेसर होईल, अशी अपेक्षा आहे. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मार्चपूर्वी आपण करु.

या विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत सातव्या वेतन आयोगाची आतापर्यंत १,०६९ प्रकरणे प्रलंबित होती. आज या कार्यक्रमामुळे फक्त ३२ प्रकरणे प्रलंबित राहिलेली आहेत. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रकरणे ३८ होती. यापैकी ३२ प्रकरणे निकाली निघाली. सेवानिवृत्तीची १९२ प्रकरणे होती. शंभर टक्के ही प्रकरणे मार्गी लागली. सेवा उपदानाची सर्व १७८ प्रकरणे निकाली निघाली. वर्षभरात ३,७६९ प्रकरणांपैकी आजपर्यंत ३,४५८ प्रकरणे मार्गी लागली आहेत. हे या उपक्रमाचे फलित आहे, असे उदय सामंत म्हणाले.

व्यासपीठावर मांडले गाऱ्हाणेयावेळी तक्रारदारांनी व्यासपीठावर जाऊन मंत्री व अधिकाऱ्यांसमोर तक्रारी मांडल्या व निवेदन सादर केले. तेव्हा उदय सामंत यांनी प्रत्येकाच्या तक्रारींचे निवारण केले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रकुलगुरु ना हरकत देत नाहीत, अशी तक्रार जे. के. जाधव यांनी केली. तेव्हा सामंत यांनी प्रकुलगुरुंची चांगलीच कानउघाडणी केली. नागराज गायकवाड यांनी कुलसचिवांविरुद्ध शपथपत्राद्वारे तक्रार दाखल केली व आरोप चुकीचा निघाल्यास आपणास विद्यापीठ गेटसमोर फाशी द्यावी, अशी मागणी केली. तेव्हा शिक्षण संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर १० जणांना विविध महाविद्यालयांमध्ये नियुक्ती आदेश देण्यात आले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण