शाळेत शिक्षक नेमके किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST2021-06-24T04:05:36+5:302021-06-24T04:05:36+5:30

निर्णयाची अंमलबजावणी २१ जून पासून करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी शासन ...

Exactly how many teachers in the school? | शाळेत शिक्षक नेमके किती?

शाळेत शिक्षक नेमके किती?

निर्णयाची अंमलबजावणी २१ जून पासून करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी शासन वेळोवेळी मार्गदर्शक सूचना व अधिसूचना जारी करीत असते. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम ग्रामीण भागातील काही मुख्याध्यापकांकडून होत आहे. शिक्षक कर्मचारी बोलविण्याचे स्पष्ट आदेश असताना पहिली ते नववीच्या शिक्षकांना मुख्याध्यापक दररोज शंभर टक्के बोलावित आहेत. मुख्याध्यापकांच्या आदेशाचे पालन करावे की शिक्षणाधिकाऱ्यांच्या? या संभ्रमात शिक्षक आहेत. कोरोनाचा सरासरी संक्रमणाचा दर लक्षात घेऊन ग्रामीण आणि महापालिका क्षेत्रातील शाळांनी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे तंतोतंतपणे पालन करणे अपेक्षित आहे परंतु तसे होताना दिसत नसल्याने मनमानी करणाऱ्या दोषींविरुद्ध कार्यवाही करण्याची गरज आहे.

Web Title: Exactly how many teachers in the school?