शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांना खंडपीठाचा दणका; आरोपातून मुक्ततेचा अर्ज फेटाळला

By प्रभुदास पाटोळे | Published: July 15, 2022 8:08 PM

या प्रकरणात कर्जदार कंपनीने बँकेशी तडजोड करून कर्ज प्रकरण मिटविले. त्यामुळे जामीनदाराचाही तसा या प्रकरणात संबंध उरला नसून सीबीआयकडून दाखल गुन्ह्यातून मुक्त करावे, अशी विनंती संभाजी पाटील यांनी केली होती.

औरंगाबाद : ३२ कोटींच्या कर्ज प्रकरणात जामीनदार म्हणून दिलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातून आपले नाव वगळावे (आरोपमुक्त करावे) अशी विनंती करणारा माजीमंत्री तथा भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा फौजदारी पुनर्विलोकन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. जी. मेहरे यांनी गुरुवारी (दि.१४) फेटाळला. निलंगेकरांच्या विनंतीवरुन सत्र न्यायालयातील कारवाईला चार आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे.

याच प्रकरणात हस्तक्षेप अर्ज दाखल करणाऱ्याचा कुठलाही संबंध येत नसल्याचे स्पष्ट करत विनाेद शंकरराव पाटील यांची याचिका खंडपीठाने निकाली काढली.

काय होते प्रकरणआ. संभाजी पाटील व त्यांच्या काही नातेवाईकांनी सुरू केलेल्या एका कंपनीने दाेन बँकांकडून ३२ कोटींचे कर्ज घेतले हाेते. हे कर्ज मिळवून देण्यासाठी संभाजी पाटील जामीनदार होते. त्यासाठी त्यांनी त्यांची मालमत्ता गहाण ठेवली होती. त्या मालमत्तेची कागदपत्रे बँकेकडे सोपवली होती. मात्र, नंतर कागदपत्रांच्या पडताळणीत गहाण ठेवलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे िनिदर्शनास आले. एका निबंधकास हाताशी धरून प्रकार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर संभाजी पाटील व त्यांच्या काही नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणात बँकेने थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार दाखल केली होती. सीबीआयनेही गुन्हा दाखल करून ४५०० पानांचे दाेषाराेपत्र न्यायालयात दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, या प्रकरणात कर्जदार कंपनीने बँकेशी तडजोड करून कर्ज प्रकरण मिटविले. त्यामुळे जामीनदाराचाही तसा या प्रकरणात संबंध उरला नसून सीबीआयकडून दाखल गुन्ह्यातून मुक्त करावे, अशी विनंती संभाजी पाटील यांनी केली होती.

सीबीआयचा युक्तीवादसीबीआयकडून ॲड. सदानंद एस. देवे यांनी युक्तिवाद केला की, कर्जासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करून बँक व संबंधित कंपनीत तडजोड होऊन प्रकरण मिटवण्याचे प्रकार सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने अशाच प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे संदर्भ त्यांनी दिले. या गुन्ह्यात संभाजी पाटील यांच्या नातेवाईकांच्याही याचिका फेटाळल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निर्दशनास आणून दिले. या प्रकरणात संभाजी पाटील यांच्यातर्फे अभयकुमार ओस्तवाल यांच्याकरीता ॲड. शिरीष गुप्ते (मुंबई) यांनी, तर राज्य सरकारकडून एस. बी. नरवडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :sambhaji nilangekarसंभाजी निलंगेकरAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ