माजी नगराध्यक्षास पावणेदोन कोटींना फसविले; सहा जणांवर गुन्हा
By Admin | Updated: May 10, 2017 00:52 IST2017-05-10T00:48:27+5:302017-05-10T00:52:37+5:30
परळी : येथील माजी नगराध्यक्ष व कापूस व्यापारी जुगलकिशोर लोहिया यांना कोल्हापूरच्या सहा व्यापाऱ्यांनी पावणेदोन कोटी रुपयांना फसविले.

माजी नगराध्यक्षास पावणेदोन कोटींना फसविले; सहा जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील माजी नगराध्यक्ष व कापूस व्यापारी जुगलकिशोर लोहिया यांना कोल्हापूरच्या सहा व्यापाऱ्यांनी पावणेदोन कोटी रुपयांना फसविले. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी सहा व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.
जुगलकिशोर रामचंद्रजी लोहिया यांचा शिवाजीनगर भागात गायत्री ट्रेडर्स व शुभम कोटेक्स नावाने व्यवसाय आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस ते कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांना विकतात. कापूस पोहोचल्यावर त्याची रक्कम देणे आवश्यक होते; परंतु कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांनी लोहिया यांच्याकडून कापूस खरेदी करुनही पैसे दिले नाही. लोहिया यांना एक कोटी ७५ लाख ३६ हजार ७६० रुपये येणे होते. मात्र, संबंधित व्यापाऱ्यांनी टाळाटाळ ्रकेली. त्यामुळे लोहिया यांनी सोमवारी शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन अमित मोहन मालडकर, अविनाश बाळासाहेब कुडचे (दोघे रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर), अमोल अनिल वाघ, शामली अमोल वाघ (दोघे रा. वाणीगल्ली, कोल्हापूर), अंबोली अमित वाघ व अविनाश आण्णासाहेब चौराले (दोघे रा. वडगाव बु. जि. पुणे) यांच्यावर फसवणूक व अपहाराचा गुन्हा नोंद झाला. आरोपी फरार असून शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.