ईव्हीएम मशीन तपासणी
By Admin | Updated: April 14, 2016 01:19 IST2016-04-14T00:37:12+5:302016-04-14T01:19:28+5:30
औरंगाबाद : सातारा-देवळाई वाढीव क्षेत्र मनपा वॉर्ड ११४ आणि ११५ निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, निवडणूक विभागाने दोन्ही वॉर्डातील

ईव्हीएम मशीन तपासणी
औरंगाबाद : सातारा-देवळाई वाढीव क्षेत्र मनपा वॉर्ड ११४ आणि ११५ निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, निवडणूक विभागाने दोन्ही वॉर्डातील उमेदवारांच्या प्रतिनिधीसमक्ष ईव्हीएम मशीन सीलबंद केल्या आहेत. १७ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया असल्याने १६ एप्रिल रोजी मशीन बुथसाठी रवाना होणार आहेत. तोपर्यंत ईव्हीएम मशीन स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
मनपा निवडणूक विभागाचे कामकाज एजीपी शाळेत सुरू असून, अर्ज दाखल केल्यापासून ते उमेदवारांचा जमाखर्चाचा दररोज हिशेबही येथेच करण्यात येत आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन पुन्हा येथील स्टाँगरूममध्ये ठेवणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी व सहायक मोहियुद्दीन काजी यांनी सांगितले.
द्वारभेटीवर भर...
वॉर्ड क्रमांक ११५ वॉर्डात शिवसेनेच्या उमेदवार पल्लवी गायकवाड यांचा प्रचार जोरात सुरू असून, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, तसेच नगरसेवकांची टीमदेखील जोरात कामाला लागली आहे.
पोलिंग चिट बहुतांश मोबाईलवर संदेशातून पाठविल्या जात असून, प्रत्यक्ष द्वारभेटीत त्या मतदारांपर्यंत पाठविण्यावर भर दिलेला आहे.
माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण गायकवाड व त्यांची टीम प्रचाराची धुरा सांभाळत आहे. काँग्रेसच्या उमेदवार सायली जमादार व भाजपच्या उमेदवार सुरेखा बावस्कर यांनीदेखील गावात भेटीगाठीवर भर दिला असून, कॉर्नर बैठकीवर जोर दिला असून, त्यांच्याही प्रिंटेड पोलिंग चिट प्राप्त झाला असून, त्या वाटपाचे काम सुरू होणार आहे.