परळीत ‘सबकुछ’ राष्ट्रवादी काँग्रेस
By Admin | Updated: January 23, 2017 23:36 IST2017-01-23T23:34:35+5:302017-01-23T23:36:44+5:30
परळी : येथील पालिकेत विषय समित्यांच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित राहिले.

परळीत ‘सबकुछ’ राष्ट्रवादी काँग्रेस
परळी : येथील पालिकेत विषय समित्यांच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित राहिले. प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
स्वच्छता-आरोग्य समिती सभापतीपदी चंदुलाल बियाणी, शिक्षण - क्रीडा समिती सभापतीपदी गोपाळ आंधळे, बांधकाम समिती सभापतीपदी शरद मुंडे यांची निवड झाली. नियोजन समितीची धुरा उपनगराध्यक्ष अय्यूब पठाण पाहणार आहेत. महिला बालकल्याण सभापती म्हणून अमृता रोडे, तर उपसभापती म्हणून अन्नपूर्णा आडे यांची वर्णी लागली. वाल्मिक कराड, अन्वर मिस्कीन, शोभा चाटे यांची स्थायी समितीवर वर्णी लागली. नगराध्यक्षा सरोजनी हालगे, मुख्याधिकारी डॉ. बाबूराव बिक्कड यांची यावेळी उपस्थिती होती. (वार्ताहर)