शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गांजा वाहतुकीसाठी प्रत्येकाला मिळणार होती हजार रुपये प्रतिदिन मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:47 IST

आंध्र प्रदेशातील राजमंडी येथून आणलेला सुमारे अर्धा क्विंटल गांजाचा साठा वैजापूर आणि शिर्डी येथे आरोपी नेत होते. ही वाहतूक करण्यासाठी आरोपींना प्रत्येकी हजार रुपये रोज मजुरी आणि प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याचा खर्च मिळणार होता, अशी माहिती समोर आली. अटकेतील तीनपैकी एक आरोपी प्रथमच गांजा तस्करीत सहभागी झाला होता. मात्र, पुंडलिकनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले आणि लॉकअ‍ॅपमध्ये जावे लागले.

ठळक मुद्देवैजापूर, शिर्डीला घेऊन जात होते गांजाचा साठा: तपास पथक जाणार आंध्र प्रदेशात

औरंगाबाद : आंध्र प्रदेशातील राजमंडी येथून आणलेला सुमारे अर्धा क्विंटल गांजाचा साठा वैजापूर आणि शिर्डी येथे आरोपी नेत होते. ही वाहतूक करण्यासाठी आरोपींना प्रत्येकी हजार रुपये रोज मजुरी आणि प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याचा खर्च मिळणार होता, अशी माहिती समोर आली. अटकेतील तीनपैकी एक आरोपी प्रथमच गांजा तस्करीत सहभागी झाला होता. मात्र, पुंडलिकनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले आणि लॉकअ‍ॅपमध्ये जावे लागले.औरंगाबाद आणि ग्रामीण भागात आंध्र प्रदेशातून चोरट्या मार्गाने गांजा आणला जातो. मात्र, बऱ्याचदा हा गांजा रेल्वेच्या मालवाहतूक करणाºया बोगीतून, तर कधी कुरिअरमार्गे येतो. मंगळवारी अलिशान कारमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती खबºयाने पोलिसांना दिली आणि सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून बीड बायपासवर सुमारे ४८ किलो गांजासह पोलुमल्ली दुर्गाप्रसाद अप्पाराव, दुर्गन रामेन लक्ष्मण आणि केडमी राकेश अप्पाराव (सर्व रा. आंध्र प्रदेश) यांना पकडले. आरोपींना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी धक्कादायक खुलासा केला आहे. गांजा वाहतूक करण्यासाठी आरोपींना प्रतिदिन हजार रुपये मजुरी आणि प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याचा खर्च मिळणार होता. अटकेतील आरोपींपैकी पोलुमल्ली आणि दुर्गन रामेन हा सराईत तस्कर आहे. त्यांनी यापूर्वी अनेकदा औरंगाबाद आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत गांजाची वाहतूक केलेली आहे, तर आरोपी केडमी अप्पाराव हा पहिल्यांदाच गांजा तस्करांसोबत औरंगाबादेत आला अन् अडकल्याचे सपोनि सोनवणे यांनी सांगितले. आरोपी शिर्डी आणि वैजापूर येथे गांजाचा पुरवठा करणार होते. आरोपींना गांजाचा साठा देणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात जाणार आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी