शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

सर्वांनी माझा तमाशा करून ठेवला, हे लिहिताना माझे हात कापताहेत, पण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 13:04 IST

विवाहितेच्या आत्महत्येची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती, पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : सूतगिरणी चौकातील संत ज्ञानेश्वरनगरमध्ये राहणाऱ्या नमिता कैलास चौधरी (४०) यांनी गुरुवारी पहाटे आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पती व सासरच्यांवर गंभीर आरोप केलेल्या दोन पानांची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती कैलास चौधरी, सासू मंगल, सासरा विजयसह सासरकडील सहा जणांवर जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नमिता यांचा २००९ मध्ये कैलाससोबत विवाह झाला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ सुरू केला. नमिता वडिलांना याबाबत सांगत होत्या. मात्र, संसार तुटू नये म्हणून माहेरच्यांनी मध्यस्थी करून कैलासची समजूत घातली होती. प्लायवूड व लॅमिनेट व्यवसाय असलेल्या कैलासचे एका महिला कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधाबाबत नमिता यांनी विचारणा केल्यानंतर कैलास त्यांना मारहाण करत होता. १९ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता नमिता यांनी सासरच्यांच्या छळाची एक ऑडिओ क्लिप बहिणीला पाठवली होती. २० मार्च रोजी काैटुंबिक छळामुळे वकिलाचा सल्लादेखील घेतला होता. नमिता यांनी गुरुवारी आत्महत्येपूर्वी पहाटे ४ वाजता वडिलांच्या व्हॉट्सॲपवर तीन मेसेज पाठवले. मात्र, ते नंतर डिलिट झाले. त्याच्या दोन तासांनी नमिता यांच्या माहेरच्यांना त्यांच्या आत्महत्येबाबत कळाले.

काय म्हटलेय सुसाइड नोटमध्ये?दोन पानांच्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी सासरच्यांच्या छळाविषयी लिहिले. घरातील वातावरणाला कंटाळले आहे. सर्वांनी माझा तमाशा करून ठेवला. या सर्व गोष्टींमुळे मुलांवर परिणाम होऊन तेदेखील मला रागावतात, उलटून बोलतात. याचा माझ्या मनावर आघात झाला आहे. माझी मुलगी माझ्या मुलाला सांभाळेल. हे लिहिताना माझे हात कापत आहेत, पण तरी हे पाऊल मी उचलत आहे, असे चिठ्ठीत नमूद आहे. उपनिरीक्षक मारोती खिल्लारे तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद