प्रत्येक शनिवारी ठाण्यांमध्ये आता तक्रार निवारणासाठी जनता दरबार

By Admin | Updated: May 20, 2017 23:30 IST2017-05-20T23:28:08+5:302017-05-20T23:30:43+5:30

बीड : ठाण्यात आता प्रत्येक शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे.

Every Saturday Saturdays, in the Thane district, the Janata Darbar | प्रत्येक शनिवारी ठाण्यांमध्ये आता तक्रार निवारणासाठी जनता दरबार

प्रत्येक शनिवारी ठाण्यांमध्ये आता तक्रार निवारणासाठी जनता दरबार

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर काहीवेळा अर्ज चौकशीवर ठेवले जातात. या तक्रारीचे पुढे काय झाले? हे जाणून घेण्यासाठी नागरिकांना ठाण्यांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे आता प्रत्येक शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने येत्या २७ मे पासून जनसंपर्क कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने दर शनिवारी सकाळी दहा ते दुपारी १ या वेळेत पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागांचे उपअधीक्षक व ठाणे प्रभारी यांच्या उपस्थितीत तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. प्रलंबित अर्जांबाबत थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी तक्रारदारांना यामुळे उपलब्ध होणार आहे. पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक कोणत्या ठाण्यांत उपस्थित राहणार आहेत, याचे नियोजन गुरुवार व शुक्रवारीच केले जाणार आहे. स्थानिक माध्यम प्रतिनिधींच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवरुन ही माहिती कळविली जाणार आहे. तक्रार निवारण बैठकीस कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकही उपस्थित राहू शकतात. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.

Web Title: Every Saturday Saturdays, in the Thane district, the Janata Darbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.