अखेर युवक महोत्सवाला प्रमुख पाहुणे मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:33 IST2017-10-24T00:33:15+5:302017-10-24T00:33:15+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर करणार असून, समारोप समारंभाला अभिनेता संदीप पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 Eventually the Youth Festival got the chief guests | अखेर युवक महोत्सवाला प्रमुख पाहुणे मिळाले

अखेर युवक महोत्सवाला प्रमुख पाहुणे मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाला अखेर प्रमुख पाहुणे मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर करणार असून, समारोप समारंभाला अभिनेता संदीप पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
युवक-युवतींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा महोत्सव येत्या रविवारपासून सुरू होत आहे. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये युवक महोत्सवात सहभागी होणे अपेक्षित असते; परंतु आतापर्यंत केवळ २३० महाविद्यालयांनी नोंदणी केली असून सहभागी न होणा-या महाविद्यालयांना दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
महोत्सवातील सहभागी विद्यार्थ्यांना दरवर्षी ढिसाळ नियोजनाचा फटका बसतो. निवास आणि भोजनाची व्यवस्था सर्वात महत्त्वाची असते. अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या महोत्सवाची तयारी पूर्ण न झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, दिवाळीच्या सुट्या आल्याने नियोजनकार्यात खंड पडला. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांना असुविधेचा सामना करावा लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Eventually the Youth Festival got the chief guests