अखेर पार्किंगचे दर होणार आता कमी

By Admin | Updated: July 29, 2016 01:12 IST2016-07-29T01:02:20+5:302016-07-29T01:12:42+5:30

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकातील पार्किंगमध्ये सध्या अवघ्या काही मिनिटांसाठी २० ते ३० रुपयांची वसुली केली जात आहे.

Eventually the parking rate will be low | अखेर पार्किंगचे दर होणार आता कमी

अखेर पार्किंगचे दर होणार आता कमी


औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकातील पार्किंगमध्ये सध्या अवघ्या काही मिनिटांसाठी २० ते ३० रुपयांची वसुली केली जात आहे. पार्किंगचालकाच्या मनमानीमुळे प्रवासी आणि त्यांना सोडण्यासाठी येणारे नातेवाईक त्रस्त होत आहे, अशा परिस्थितीमुळे आता नवीन कंत्राट नेमताना काही वेळेसाठी किमान १० रुपये घेण्याची सूचना केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच पार्किंगचे दर कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाच वर्षांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानकातील पार्किंगचे कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटाची मुदत केव्हाच संपली आहे. लवकरच नवीन कंत्राटदाराची नेमणूक होेणार आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात त्याच कंत्राटदारास मुदतवाढ देण्यात आली आहे. पार्किंगसाठी अवघ्या काही मिनिटांसाठी २० ते ३० रुपयांची मागणी केली जात आहे. एस.टी.महामंडळाकडून लवकरच नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये कंत्राटदार नेमताना प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या सुविधेसाठी काही वेळेसाठी किमान १० रुपये आकारण्याची सूचना केली जाणार आहे, असे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी सांगितले.
पार्किंगमध्ये अवघ्या काही वेळेसाठी २० ते ३० रुपये आकारण्यात येतात. हे पैसे वाचविण्यासाठी अनेक जण बसस्थानकातील फलाटासमोर, निवासस्थानाजवळ दुचाकी उभ्या करतात.
४ परंतु वाहतूक पोलिसांकडून अशा दुचाकी उचलून थेट छावणी पोलीस ठाण्यात जमा केल्या जातात. त्यामुळे पैसे वाचविण्याच्या प्रयत्नात जास्तीचा भुर्दंड वाहनधारकांना सहन करावा लागतो.
४याविषयी अनेक जण बसस्थानकातील अधिकाऱ्यांक डे तक्रार करतात.

Web Title: Eventually the parking rate will be low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.