अखेर जिल्हा पुरस्काराला मुहूर्त
By Admin | Updated: September 2, 2014 01:51 IST2014-09-02T00:35:52+5:302014-09-02T01:51:49+5:30
लातूर : या ना त्या कारणास्तव गेल्या अनेक दिवसापासून भिजत पडलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्काराची यादी प्रशासनाने सोमवारी जाहिर केली़ प्राथमिक व माध्यमिक मधुन निवड झालेल्या १

अखेर जिल्हा पुरस्काराला मुहूर्त
लातूर : या ना त्या कारणास्तव गेल्या अनेक दिवसापासून भिजत पडलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्काराची यादी प्रशासनाने सोमवारी जाहिर केली़ प्राथमिक व माध्यमिक मधुन निवड झालेल्या १७ जणांचा शिक्षक दिनी मान्यवरांच्या हस्ते गौरव होणार आहे़
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांमधून १० तर माध्यमिक मधील ७ शिक्षकांची निवड करण्यात आली़ या शिक्षकांची यादी तयार करताना प्रशासनासह पदाधिकाऱ्यांची दमछाक झाली होती़ आपल्या कार्याची दखल घेत कौतुकाची थाप आपल्याच पाढीवर पडाची अशी प्रत्येक गुरुजनांची ईच्छा होती़ त्यामुळे प्राप्त प्रस्तावांपैकी पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी शिक्षकांमध्ये चांगलीच स्पर्धा लागली होती़ जिल्ह्यातील बहुतांश तालुक्याची यादी तयार करण्यात आली़ मात्र लातूर, रेणापूर व औसा येथील पुरस्काराबाबत पेच निर्माण झाला होता़ त्यामुळे शिक्षण विभागाने एक समिती गठीत करुन संबंधीत शाळांचे मुल्यांकन करत गुणदान केले़ तद्नंतर जिल्हा परिषदेतील समितीने निवड केलेल्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची अंतिम यादी जाहिर केली़ पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे जि़प़अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे आदींसह विविध विभागाचे सभापती व सदस्यांनी स्वागत केले आहे़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्याची यादी तयार करण्यात आली होती. मात्र लातूर, रेणापूर व औसा येथील शिक्षक पुरस्काराबाबत पेच निर्माण झाला होता़ तथापि, यावर सकारात्मक चर्चा होऊन यादी तयार झाली.