पाऊस पडूनही प्रकल्प जोत्याखालीच
By Admin | Updated: August 31, 2014 01:11 IST2014-08-31T00:33:57+5:302014-08-31T01:11:23+5:30
व्यंकटेश वैष्णव, बीड शहरवासीयांची तहान भागविणारे बिंदूसरा प्रकल्प अद्यापही अद्यापही तहानलेलेच आहे. धरणाच्या पाणी पातळीत अत्यल्प वाढ झाली आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार

पाऊस पडूनही प्रकल्प जोत्याखालीच
व्यंकटेश वैष्णव, बीड
शहरवासीयांची तहान भागविणारे बिंदूसरा प्रकल्प अद्यापही अद्यापही तहानलेलेच आहे. धरणाच्या पाणी पातळीत अत्यल्प वाढ झाली आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार शनिवारपर्यंत बिंदूसरा पकल्पात ०.५३४ द. ल. घमी पणीसाठा आहे. अद्यापही ज्योत्याखाली आहे. तर माजलगाव धरणात १४४.१० द.ल.घ.मी. पाणीसाठा असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील चार दिवसापासून जिल्हयातील धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने लघु व मध्यम प्रकल्पात अल्पसा पाणी साठा झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठलेले नसल्याचे चित्र आज तरी जिल्हयात पहावयास मिळते. झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्या शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नाही. अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
जिल्हयात एकूण १४१ लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मागील आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाऊसाने हजेरी लावली आसली तरी लघु व मध्यम प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. ही बीड जिल्यातील वस्तुस्थिती आहे.
सर्व तालुक्यांतून जयाकवाडी पाठबंधारे विभागाला शनिवारी मिळालेल्या महिती नुसार बीड जिल्हयातील ४४ ते ४६ लघु व मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. जोत्याखाली असलेल्या सिंचन प्रकल्पांमध्ये सिंदफणा, बेलपारा, कटवट, मौज, ईट, शिवणी, जरूड, वडगाव भंडारवाडी, खोकरमोहा, वारणी, नागतळवाडी, नारायणगड, दासखेड, मुंगेवाडी यासह अनेक प्रकल्पांचा समावेश आहे़