आजही सचखंड,श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:18 IST2017-08-27T00:18:16+5:302017-08-27T00:18:16+5:30
पंजाब, हरियाणामध्ये उद्भवलेल्या हिंसाचारामुळे उत्तर भारतातून धावणाºया रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ शनिवारनंतर आज रविवारीही नांदेड येथून उत्तर भारतात जाणारी सचखंड आणि श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे़

आजही सचखंड,श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पंजाब, हरियाणामध्ये उद्भवलेल्या हिंसाचारामुळे उत्तर भारतातून धावणाºया रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ शनिवारनंतर आज रविवारीही नांदेड येथून उत्तर भारतात जाणारी सचखंड आणि श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे़
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम-रहिम यांना न्यायालयाने दोषी ठरवताच त्यांच्या समर्थकांनी जाळपोळ, दगडफेक सुरू केली आहे़ त्यामुळे पंजाब, चंदीगड, हरियाणातील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या़ तर बहुतांश गाड्या विलंबाने धावत आहे़ उत्तर भारतातून नांदेडकडे येणाºया गाड्या विलंबाने धावत असल्याने नांदेडहून उत्तर भारतात धावणाºया गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़
शनिवारच्या घटनेनंतर अमृतसरहून येणारी श्री हुजूर साहिब सचखंड एक्स्प्रेस तीन ते चार तास उशिराने धावल्याने रविवारी रात्री उशिरा नांदेडात पोहोचली़ यापूर्वी शनिवारी नांदेडातून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस आणि उना हिमाचल नांगलदम रद्द करण्यात आली़ तर रविवारी नांदेडहून सुटणाºया दोन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या़ त्याचबरोबर अमृतसरहून रविवारी निघणारी सचखंड एक्स्प्रेसही रद्द केली आहे़
रविवारी नांदेड येथून धावणारी गाडी संख्या - १२७१५ नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि गाडी संख्या - १२४८५ नांदेड - श्रीगंगानगर एक्स्प्रेस २७ आॅगस्ट रोजी रद्द करण्यात आल्यामुळे सलग दोन दिवस या मार्गावरील प्रवासी ताटकळले आहेत़ रेल्वेस्थानकावरही गर्दी होती़