शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

तुमच्या अंगणातले झाड तोडायचे तरी घ्यावी लागते परवानगी, अन्यथा होईल फौजदारी कारवाई

By मुजीब देवणीकर | Updated: December 15, 2023 18:42 IST

वृक्ष प्राधिकरणाची परवानगी नसेल तर होऊ शकते फौजदारी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : आपल्या अंगणात एखादे मोठे झाड असेल आणि तोडण्याची वेळ आली तर परस्पर तोडता येत नाही. त्यासाठी महापालिकेने नेमलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घ्यावी लागते. परवानगी न घेता झाड तोडल्यास दंडात्मक अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई हाेऊ शकते. समिती झाड तोडण्याचे कारण, गरज लक्षात घेऊन परवानगी देते.

शहरात अगोदरचे वृक्षांची संख्या झपाट्याने कमी हाेऊ लागली. जिकडे तिकडे सिमेंटचे जंगल उभे राहू लागले. भविष्यात नागरिकांना शुद्ध हवा कशी मिळेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दरवर्षी पावसाळ्यात विविध संस्था, संघटना वृक्षारोपण मोहीम राबवितात. मात्र, नंतर ती झाडे जगतात का? याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. प्रत्येक घरासमोर एक झाड लावण्याची आज नितांत गरज असताना नागरिकांना विविध कारणांमुळे झाडे तोडावीसुद्धा लागतात. कोणीही परस्पर झाडे तोडू नयेत म्हणून शासनाने कायदा केला. त्याची अंमलबजावणी शहरी भागात महापालिकेला करावी लागते.

कुठलेही झाड-फांद्या तोडायच्या असल्यास लागते परवानगीशहरात कुठेही झाड, फांद्या कापायच्या असतील तर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक असते.

अर्ज कसा करायचा?महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या कार्यालयात साध्या कागदावरही अर्ज करता येऊ शकतो. त्यासाठी संपूर्ण विवरण म्हणजे झाड कोणते? कशासाठी तोडणे आवश्यक याबाबींचा उल्लेख अर्जदाराला करावा लागतो.

कोणत्या कारणासाठी झाड तोडता येतेझाड जुने असेल, इमारतीवर त्याच्या फांद्या किंवा झाड कोसळल्यास जीवतहानी होऊ शकते. घराचे बांधकाम करायचे असेल झाड अडसर ठरत असेल तर परवानगी मिळू शकते. त्यापूर्वी मनपा अधिकारी, कर्मचारी झाडाची पाहणी करतात.

कोठे मिळते परवानगी? महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात उद्यान अधीक्षक यांच्या कार्यालयात झाडे, फांद्या कापण्यासाठी अगोदर अर्ज करावा लागतो. अधून मधून समितीची बैठकीत सर्व अर्जांवर एकत्रित निर्णय होतो. तर गुन्हा दाखल होईल.

एखाद्या नागरिकाने परवानगी न घेता झाड तोडल्यास त्याच्या गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. अनेकदा आसपासचे नागरिक मनपाकडे तक्रार करतात. तक्रारीची शहानिशा करून नंतर कारवाई केली जाते. 

११ महिन्यांत ९२ झाडे तोडण्याची परवानगीजानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे किमान ३८२ पेक्षा अधिक झाडे तोडण्यासाठी अनेक नागरिकांनी परवानगी मागितली. त्यातील ९२ झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली.

प्रत्येक अर्जाची शहानिशा शुल्लक कारणांसाठी अनेकजण झाड तोडण्याची परवानगी मागतात. अर्जाचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती निर्णय घेते. प्रत्येक अर्जाची जागेवर जाऊन शहानिशा केली जाते.- विजय पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी