शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

युती झाली तरीही नेत्यांचे मनोमिलन झाले नाही; भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी जिल्ह्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 1:58 PM

भाजपचे दोन-तीन पदाधिकारीच शिवसेनेच्या प्रचारात 

ठळक मुद्देयुतीमध्ये आलबेल नाही

- राम शिनगारे औरंगाबाद : भाजप-शिवसेनेची युती असली तरीही नेत्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसते आहे. जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी स्वपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इतर जिल्ह्यांत गेले आहेत. तेथील मतदान झाल्यानंतर शेवटच्या एक-दोन दिवसांसाठी औरंगाबादेत दाखल होणार असल्याचे या नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ युतीत  शिवसेनेच्या वाट्याला आहे. येथे विद्यमान खासदारांनाच शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. युती होण्यापूर्वी भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये विविध कारणांवरून कलगीतुरा रंगलेला होता. युती झाल्यानंतरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत असलेली शिवसेनेची सोबत तोडून टाकावी, त्याशिवाय प्रचारात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. शेवटी महापौरांच्या बंगल्यावर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वयाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेससोबत असलेली युती सोडण्यास शिवसेना तयार झाली. मात्र, जि.प. अध्यक्षा राजीनामा देणार नाहीत. त्यांचा कालावधी संपल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होईल. तोपर्यंत काँग्रेसची जि.प.मध्ये असलेली सत्ता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

या बैठकीनंतर भाजपच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी बीड, जालना, नागपूर आदी ठिकाणच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला प्राधान्य दिले आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर देशव्यापी दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळीच त्या हैदराबादहून श्रीनगरकडे रवाना झाल्या. तेथे त्या चार दिवस राहतील. त्यानंतर इतरही ठिकाणी त्यांचे नियोजित दौरे आहेत.  औरंगाबादेत युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी  एक-दोन दिवसांचा वेळ काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांनी शहरातील १२ सहकाऱ्यांना घेऊन मागील दहा-बारा दिवसांपासून नागपुरात तळ ठोकला आहे.  भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  डॉ. भागवत कराड , शहर उपाध्यक्ष जालिंदर शेंडगे यांनी बीड जिल्हा जवळ केला आहे. त्यांच्यासह सतीश नागरे, प्रशांत देसरडा, समीर राजूरकर, डॉ. राम बुधवंत, संग्राम पवार अशी पदाधिकाऱ्यांची फौज आहे.  माजी महापौर भगवान घडामोडे, नगरसेवक प्रमोद राठोड, राजू शिंदे आदींसह इतर नगरसेवकांनी जालना जिल्ह्यास प्राधान्य दिले . 

हे करताहेत युतीचा प्रचारऔरंगाबादेतील युतीच्या उमेदवाराचा प्रचार भाजपचे आ. अतुल सावे करीत आहेत. त्यांनी पूर्व मतदारसंघाच्या बाहेर जाण्यास प्राधान्य दिलेले नाही. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रचार करण्यात प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. याचवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनीही वैजापूर तालुक्यातील प्रचारात सहभाग नोंदवला आहे. त्यातही त्यांनी स्वतंत्र प्रचार सुरू केला असल्याची माहिती आहे. प्रवक्ते शिरीष बोराळकर हे एकमेव शिवसेना नेत्यांसोबत प्रचारात सहभागी होत भाजपची बाजू सांभाळत असल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या घरी दु:खद घटना घडलेली असल्यामुळे ते अद्याप प्रचारात सहभागी झालेले नाहीत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना