शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने जो बायडन, सुनक यांना आणले तरी इथे फक्त शिवसेनेचा भगवा फडकणार : संजय राऊत

By बापू सोळुंके | Updated: February 13, 2024 19:36 IST

भाजपने कितीही नेते आयात केले तरी २००पेक्षा अधिक जागा मिळणार नाही

छत्रपती संभाजीनगर: भारतीय जनता पक्ष थेट काँग्रेससोबत युती करू शकत नाही, यामुळे ते अशा प्रकारे काँग्रेसमधील नेते पक्षात घेत आहेत. असे कितीही नेते तुम्ही पक्षात घेतले तरी लोकसभा निवडणूकीत तुम्हाला २०० पेक्षा जागा मिळणार नाही, असे खडेबोल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे भाजपला सुनावले. तसेच देशातीलच नव्हे तर अमेरिकेचे जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांना भाजपत आणले तरी इथे फरक पडणार नाही. इथे शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकणार असल्याचा दावा खा. राऊत यांनी केला. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा पार पडली. ठाकरेसोबत राऊत काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते. आज मंगळवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मोदी देशाला काय तोंड दाखवणार? खोटे पणाचा चेहरा राहिला आहे. नांदेमधील सभेत कारगिल युद्धातील शहिदांच्या कसा अवमान केले हे मोदींनी सांगितले होतं. आणि आज काय झालं शहिदांचा अपमान धुऊन काढला का? त्यांना भाजपमध्ये घेऊन असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. काँग्रेस बरोबर थेट युती करायचं टाळून अशा पद्धतीने पद्धतीने युती करत आहेत. मात्र अशा पद्धतीने आगामी निवडणुकीत ते २००पेक्षा अधिक जागा मिळू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन, आदर्श घोटाळा कसा झालं हे समजावले यानंतर मोदी काय बोलले होते, हे पाहून कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असा विचार येतो.

शिंदेसोबतच सोडणार होते पक्ष अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही. कालपर्यंत जागा वाटप करत होते .दोन वर्षापूर्वी शिंदे सोबत पक्ष सोडणार होते, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तसेच गेल्या काही दिवसांपासून चव्हाण धडपड करत आहे. ते अत्यंत हुशार प्रशासक आहेत. संघटनात्मक बाबींवर त्यांची पकड होती. मात्र, हा निर्णय त्यांच्या स्वतःसाठी धोक्याचा असल्याचेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना