शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

चिंताजनक! जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहा पट बाष्पीभवन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:47 IST

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव, पैठणसह डीएमआयसी तसेच जालनासह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो.

- दादासाहेब गलांडेपैठण : तालुक्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही दररोज होणाऱ्या पाणी उपशापेक्षा ६ पट वाढले आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे.

पैठण तालुक्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यावर होत आहे. सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा मागील वर्षापेक्षा यावर्षी दोन पटींनं जास्त आहे. मागील वर्षी १५ एप्रिल रोजी धरणात फक्त १५.२० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी धरणात याच दिवशी ४७.३९ टक्के पाणीसाठा आहे. धरणात सध्या १७६७.०१ दलघमी पाणीसाठा असून त्यात १०२८.९० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षासाठी जायकवाडी धरणात अल्प प्रमाणात पाणी असल्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नव्हते. तसेच पिण्याच्या पाण्यातही काही ठिकाणी कपात करण्यात आली होती. 

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव, पैठणसह डीएमआयसी तसेच जालनासह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी दररोज केवळ ०.२९ दलघमी पाणी उपसा केला जातो; मात्र उष्णता वाढल्यामुळे दररोज जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. मार्च महिन्यात ५५.२८५ दलघमी बाष्पीभवन झाले असून मंगळवारी बाष्पीभवनाचा वेग १.९८८दलघमी होता. यावर्षी जायकवाडी धरण १०० टक्के भरले होते. धरणात १११.२५५६ टीएमसी पाणी आले. तर विसर्ग धरणातून ८६२.९६१५ टीएमसी पाणी गोदापात्रात सोडण्यात आल्याचे शाखा अभियंता विजय काकडे म्हणाले.

२४३.७३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवनजायकवाडी धरणातील पाण्याचे डिसेंबर २०२४ मध्ये २०.६१४ दलघमी बाष्पीभवन झाले तर जानेवारीमध्ये २०२५ मध्ये २४.६६८ दलघमी, फेब्रुवारीत २९.८१४ दलघमी, मार्चमध्ये ५५.२८५ दलघमी बाष्पीभवन झाले. १ जुलै २०२४ ते आजपर्यंत जायकवाडी धरणातील २४३.७३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

सिंचन व पिण्याच्या पाण्यात कपात नाहीजायकवाडी धरणात आज रोजी ४७.३९ टक्के पाणीसाठा असून, डाव्या कालव्यातून २१५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बाष्पीभवनाचा आजचा वेग १.९८८ दलघमी आहे. धरणातून पिण्यासाठी जेवढे पाणी दररोज उपासले जाते, त्याच्या सहा पटींनी बाष्पीभवन होत आहे. यावर्षी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यात कपात केली जाणार नाही.- विजय काकडे, शाखा अभियंता.

तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार?पैठण तालुक्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या काही वेबसाइटनी व्यक्त केला आहे. द वेदर चॅनल नावाच्या वेबसाइटने १६ एप्रिल रोजी ४०, १७ व १८ रोजी ४१ अंश आणि १९ व २० रोजी ४२ अंश सेल्सिअस तापमान पैठणचे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच २१ व २२ रोजी ४२, तर २३ एप्रिल रोजी ४३ अंश सेल्सिअस तापमान राहील, असे या वेबसाइटचे म्हणणे आहे. त्यामुळे यापुढील काळात पुन्हा जायकवाडी धरणातील तापमान वाढणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर