शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

अंदाज समिती हिंगोलीत दाखल

By admin | Updated: July 6, 2017 23:22 IST

हिंगोली : परभणी जिल्ह्याचा दौरा आटोपून अंदाज समिती हिंगोलीच्या दौऱ्यावर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : परभणी जिल्ह्याचा दौरा आटोपून अंदाज समिती हिंगोलीच्या दौऱ्यावर आली आहे. जवळपास दहा ते बारा आमदारांसह मंत्रालयीन अधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांचा मोठा लवाजमा हिंगोलीच्या विश्रामगृहावर जमल्याने एकच गर्दी झाली होती. वाळू व सा.बां.ची कामे या बाबींकडे अधिकचा कटाक्ष असल्याचे सूत्रांकडून कळाले.हिंगोली जिल्ह्यात अंदाज समिती येणार असल्याने मागील काही दिवसांपासून त्यादृष्टिने प्रशासकीय यंत्रणा तयारी करताना दिसत होती. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. या समितीनेही आधीच प्रश्नावली पुरविली होती. त्यानुसार त्या-त्या विभागांनी आढावाही सादर केलेला आहे. त्यात दुष्काळ काळातील उपाययोजना, राज्य उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरि पुरवठा, गौण खनिज आदी बाबींच्या माहितीचा समावेश आहे. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही समिती हिंगोलीत दाखल झाली. त्यानंतर त्यांनी विविध विभागाच्या प्रमुखांशी विश्रामगृहात चर्चा केली. त्यात प्रामुख्याने जिल्ह्याच्या विकासाच्या परिस्थितीचा मुद्दा होता. त्यानंतर ही बैठक आटोपली. त्यामुळे आता ७ रोजी ही समिती पुन्हा कामाला लागणार आहे. परभणीत या समितीच्या तपासणीत अनेकांचे पितळ उघडे पडले. काहींना निलंबितही करण्यात आले आहे. आता हिंगोलीत त्यामुळे आधीच धडकी भरलेली आहे. बैठकीनंतर बाहेर जमलेला ताफा याच विवंचनेत असल्याचे दिसून येत होता. परभणीतच अंदाज समितीच्या कठोर भूमिकेचा आता बरोबर अंदाज प्रशासनालाही आला आहे. त्यामुळे काहींनी तर देव पाण्यात घातले आहेत. उद्या तपासणीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.