नांदेडमध्ये आरक्षण बचाव समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:09 IST2017-08-31T00:09:47+5:302017-08-31T00:09:47+5:30
केंद्र व राज्यात शासकीय-निमशासकीय कार्यालयातील मागासवगीर्यांच्या पदोन्नतीबाबतचे आरक्षण हटविल्याच्या निर्णयाविरोधात बहुजनांच्या विविध अधिकारी-कर्मचाºयांनी एस.सी., एस.टी., एन.टी., डी़एन.टी., एस.बी.सी., ओबीसी कर्मचारी आरक्षण बचाव समिती स्थापन केली़

नांदेडमध्ये आरक्षण बचाव समितीची स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: केंद्र व राज्यात शासकीय-निमशासकीय कार्यालयातील मागासवगीर्यांच्या पदोन्नतीबाबतचे आरक्षण हटविल्याच्या निर्णयाविरोधात बहुजनांच्या विविध अधिकारी-कर्मचाºयांनी एस.सी., एस.टी., एन.टी., डी़एन.टी., एस.बी.सी., ओबीसी कर्मचारी आरक्षण बचाव समिती स्थापन केली़
समितीच्या अध्यक्षपदी संजीवन गायकवाड, कार्याध्यक्षपदी मिलिंद बनसोडे, उपाध्यक्षपदी पी़ जी. गोणारे, एकनाथ बुरकुले, गणेश भुसा, तेजस्विनी हत्तीअंबिरे, डॉ. उत्तम सोनकांबळे, सचिवपदी अरुण दगडू, सहसचिव डॉ. हेमंत कार्ले, कोषाध्यक्ष जी़ पी. येसनकर, पी़ एम. ईश्वरे, सल्लागार आर. एस. टोके, संघटक अशोक जोगदंड, प्रा. गौतम दुथडे, मिलिंद भिंगारे, साहेबराव पवार, प्रसिद्धीप्रमुखपदी डॉ. योगेश पारवे, किशोर झिंझाडे, मिलिंद व्यवहारे तर समन्वयकपदी श्याम निलंगेकर व बी़ बी. पवार यांची सवार्नुमते नियुक्ती करण्यात आली. या समितीच्या वतीने मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबत ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली जाणार आहे़