न्यु आधार जनसेवा फाउंडेशनची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST2021-02-09T04:06:16+5:302021-02-09T04:06:16+5:30

विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला आधार देण्याचे कार्य या संस्थेतर्फे केले जाणार आहे. आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे ...

Establishment of New Aadhar Janseva Foundation | न्यु आधार जनसेवा फाउंडेशनची स्थापना

न्यु आधार जनसेवा फाउंडेशनची स्थापना

विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला आधार देण्याचे कार्य या संस्थेतर्फे केले जाणार आहे. आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. भागवत कराड अध्यक्षस्थानी होते.

आ. दानवे यांनी संस्थेच्या उद्देशांचे कौतुक केले. संस्थेचे उद्देश उत्कृष्ट असले, तरी संस्थेने सुरुवातीला मोजक्याच विषयांवर लक्ष केंद्रित करावे, असे आ. सावे यांनी सुचविले. या कार्यक्रमात डॉ. प्रवीण सूर्यवंशी, प्रितीश चॅटर्जी, डॉ. अनंत पंढरे, संदीप नागोरी, डॉ. सुंदर कुलकर्णी यांचा कोरोनाकाळात दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

महिलांसाठी फिरते शौचालय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, गोशाळा, रोजगार मार्गदर्शन असे उपक्रम राबविणार असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत जयपूरकर यांनी सांगितले. प्रबिरकुमार घोष, एन. के. चक्रवर्ती यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.

औरंगाबादकरांचे राहणीमान उंचविण्यासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी संस्थेने प्रयत्न करावा, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. भागवत कराड यांनी केले.

फोटो ओळ :

न्यू आधार जनसेवा फाउंडेशनच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.

Web Title: Establishment of New Aadhar Janseva Foundation