इंग्रजी शाळांच्या प्रवेश प्रक्रीया तपासणीसाठी समिती स्थापन
By Admin | Updated: June 27, 2014 00:15 IST2014-06-26T23:43:07+5:302014-06-27T00:15:30+5:30
नांदेड : नियमावलींची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आले़

इंग्रजी शाळांच्या प्रवेश प्रक्रीया तपासणीसाठी समिती स्थापन
नांदेड : शहर व परिसरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच गर्दीच्या शाळेत वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांना २५ टक्के प्रवेश देण्याच्या नियमावलींची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आले़
जि़ प़ चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक गुरूवारी घेण्यात आली़ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार प्रवेश प्रक्रीया तपासणीसाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या समितीत शिक्षण विस्तार अधिकारी बंडू आमदूरकर, व्यंकटेश चौधरी, दीपक शिरसाट, रोडे यांचा समावेश आहे़ जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तीन शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले़ जिल्ह्यातील निमशिक्षकांना पूर्णवेळ शिक्षक म्हणून १ जुलैपूर्वी नियुक्ती आदेश दिले जातील, असे सभापती कऱ्हाळे यांनी सांगितले़ बैठकीस सदस्य बळवंतराव पाटील, सुरेखा कदम, जयश्री पावडे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)