परभणीत ३६ पथकांची स्थापना
By Admin | Updated: September 13, 2014 00:11 IST2014-09-12T23:52:28+5:302014-09-13T00:11:40+5:30
परभणी: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

परभणीत ३६ पथकांची स्थापना
परभणी: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारी सायंकाळपासून राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू झाली असून, प्रशासनाने ३६ आचारसंहितेवर वॉच ठेवण्यासाठी ३६ पथके स्थापन केली आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रशासनाच्या तयारीसंदर्भात माहिती दिली. जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून, प्रशासन सज्ज झाले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच जिल्ह्यात ३६ पथके कार्यरत केले आहेत. जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ असून, प्रत्येक मतदार संघात तीन या प्रमाणे १२ भरारी पथके कार्यरत झाले आहेत. त्याचप्रमाणे आचारसंहितेची प्रत्येकी ३ अशी बारा आणि १२ संनियंत्रण पथके कार्यरत करण्यात आली आहेत. एक उपविभागीय अधिकारी, एक पोलिस अधिकारी, दोन पोलिस कर्मचारी आणि एक व्हिडीओग्राफर या पथकामध्ये राहणार आहे. त्याचप्रमाणे चौदा नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी दिली आहे.
निवडणूक काळात पैश्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, या निवडणुकीत देखील प्रत्येक नाक्यावर तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक मतदारांना व्होटर स्लिप देण्याचे प्रयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.