अपघतांचा ठरला वार

By Admin | Updated: May 25, 2014 01:04 IST2014-05-25T01:02:41+5:302014-05-25T01:04:09+5:30

जालना - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वेगवेगळ्या चार अपघातांमध्ये दोन ठार तर चार जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Errors' decision to go | अपघतांचा ठरला वार

अपघतांचा ठरला वार

जालना - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वेगवेगळ्या चार अपघातांमध्ये दोन ठार तर चार जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाफराबाद - खासगाव रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री खासगावनजीक घडली. दोन्ही जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भावळ (ता. चिखली) येथील शिवदास सखाराम घन व अन्य दोघे हे नातवाईकांच्या येथे आयोजित कंदुरीच्या कार्यक्रमासाठी आले होते. रात्री ते मोटारसायकलने परत जात असताना खासगावजवळ भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात शिवदास घन हे जागीच ठार झाले तर गणेश भाऊराव रावळकर, राहुल हिरामन भंडारे हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी शनिवारी संतोष रावळकर यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देशपांडे यांनी दिली. कारने गेट तोडले जालना शहरातील रेल्वेस्थानकालगत असलेले गेट भरधाव कारने तोडले. ही घटना शनिवारी रात्री घडली. रेल्वेस्थानकाच्या समोरील बाजूने जमुनानगरकडे ही कार जात असताना पहिल्या गेटमधून कार पुढे गेली, तोच रेल्वे येण्यासाठी गँगमनने गेट बंद केले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली ही कार समोरील गेटवर आदळली. त्यामुळे गेटचे तुकडे पडले. या अपघातात कोणी जखमी झाले का, याविषयीची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. या अपघातानंतर घटनास्थळी काही वेळ बघ्यांनी गर्दी केली होती. मात्र लोहमार्ग पोलिस चौकीतील पोलिसांनी तात्काळ तेथे पोहोचून जमाव पांगविला. मठपिंपळगाव येथे अपघात मठपिंपळगाव येथे दोन दुचाकींचा अपघात झाला होता. यात सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास मो.सा. एम.एच.२१- ६०९२ व एम.एच.२१-डब्ल्यू. ३९३७ यांची धडक झाली. यामध्ये येडूबा सखाराम धांडगे (रा. कुंभेफळ, ता. जालना) हा जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शनिवारी करण्यात आली. (प्रतिनिधी)वाटूर - जालना-मंठा रोडवरील येदलापूर पाटीजवळ भरधाव अ‍ॅपे व मोटारसायकल अपघातात दोघेजण जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी जालना-मंठा मार्गावरील येदलापूर पाटीजवळ घडली. जखमींना उपचारासाठी जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात पंडित शेजूळ (कोठाळवाडी, ता. औरंगाबाद) व जानकाबाई तोताराम शिरोदे (बुलढाणा) हे दोघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने जालना येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Errors' decision to go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.