बिंदू नामावलीत पुन्हा त्रुटी; प्रस्ताव फेटाळला

By Admin | Updated: September 1, 2016 01:04 IST2016-09-01T00:18:41+5:302016-09-01T01:04:21+5:30

बीड : येथील जि. प. शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांची बिंदू नामावली मंजुरीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे पाठविली होती.

Error again in point credentials; Proposal rejected | बिंदू नामावलीत पुन्हा त्रुटी; प्रस्ताव फेटाळला

बिंदू नामावलीत पुन्हा त्रुटी; प्रस्ताव फेटाळला


बीड : येथील जि. प. शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांची बिंदू नामावली मंजुरीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे पाठविली होती. मात्र, त्यात त्रुटी आढळल्यामुळे जि. प. ने पाठविलेला प्रस्ताव परत करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जि.प.मध्ये शिक्षकांची बिंदू नामावली तयार नाही. मागासवर्गीयांच्या ४९६ जागा रिक्त असून, त्या ठिकाणी इतर प्रवर्गातील शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. बेकायदेशीर आंतरजिल्हा बदलीद्वारे जिल्ह्यात एक हजाराहून अधिक शिक्षक आले होते. त्यामुळे हा सारा घोळ झाला आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २०१५ मध्ये जिल्ह्याला शासनाने ७९३ वाढीव पायाभूत पदे मंजूर केली. बिंदू नामावली तयार करून त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचे आदेश होते. मात्र, बिंदू नामावलीचे त्रांगडे काही सुटायला तयार नाही.
केवळ नोटिसांचा फार्स
बिंदू नामावलीतील त्रुटींबाबत आयुक्त कार्यालयाने यापूर्वीही जि. प. कडे विचारणा केली आहे. त्यानंतर सीईओंनी शिक्षणाधिकाऱ्यांसह सात कर्मचाऱ्यांना नोटीस दिली. मात्र, ठोस कारवाई झाली नाही. (प्रतिनिधी)
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात आहे. बिंदू नामावलीतील त्रुटी दूर का होत नाहीत ? ही आश्चर्याची बाब आहे. - डिगांबर गंगाधरे
जिल्हाध्यक्ष, रि. एम्प्लॉईज फेडरेशन
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची बिंदू नामावली नसल्याने ५०० जागा गोठल्या आहेत. त्यामुळे हा मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर अन्याय आहे. - विजयकुमार समुद्रे
संस्थापक, ब. क. कल्याण महासंघ
जि.प. सीईओ नामदेव ननावरे म्हणाले, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. बिंदू नामावलीत काही त्रुटी असतील तर त्या दूर करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.

Web Title: Error again in point credentials; Proposal rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.