सभापती निवडीची समीकरणे बदलली
By Admin | Updated: September 30, 2014 01:27 IST2014-09-29T23:54:03+5:302014-09-30T01:27:38+5:30
बीड : युती, आघाडीतील फाटाफुटीने जिल्हा परिषदेत २ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या सभापती निवडीची समीकरणे पूर्णत: बदलली आहेत़ विधानसभा निवडणुकीतील राजकीय खेळ्यांमुळे

सभापती निवडीची समीकरणे बदलली
बीड : युती, आघाडीतील फाटाफुटीने जिल्हा परिषदेत २ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या सभापती निवडीची समीकरणे पूर्णत: बदलली आहेत़ विधानसभा निवडणुकीतील राजकीय खेळ्यांमुळे कोण बाजी मारणार? हे सांगणे कठीण बनत आहे़
२१ सप्टेंबर रोजी जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला़ यावेळी युती व आघाडीकडे २९-२९ असे समसमान बलाबल होते़ रोमांचक वळणावर येऊन ठेपलेल्या या निवडी अखेर चिठ्ठया टाकून कराव्या लागल्या़ यात आघाडीचे नशिबच ‘लयं भारी ’ ठरले़ २ आॅक्टोबर रोजी विद्यमान सभापतींचा कार्यकाळ संपत आहे़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच सभापतीपदासाठी निवड प्रक्रिया पार पडत आहे़
आता महायुती तुटली आहे़ जि़ प़ मध्ये आजघडीला भाजपाकडे २६ सदस्य असून दोन शिवसेनेचे आहेत तर रासपकडेही एक सदस्य आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीच्या तंबूत २८ सदस्य असून काँग्रेसकडेही एक सदस्य आहे़ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत युती- आघाडीने फाटाफूट रोखली होती़ सभापती निवडीत समान संख्याबळामुळे चिठ्ठ्या टाकाव्या लागतील, अशी स्थिती कालपर्यंत होती; परंतु आता विधानसभेतील नाराजीने काहीही होऊ शकते असे चित्र आहे़
विधानसभेतील नाराजीने
वाढविली चिंता
विधानसभा निवडणुकीत उडालेला बंडाचा धुराळा अजून जमिनीवर नीट बसलेलाही नाही़ त्यातच सभापती निवडीचा कार्यक्रम होणार असल्याने सर्वच पक्ष धास्तावले आहेत़ माजलगावात भाजपाचे भाई गंगाभिषण थावरे विधानसभेसाठी इच्छुक होते़ पक्षाने त्यांचा पत्ता कट केल्यावर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती़ त्यांच्या पत्नी जि़प़ सदस्या आहेत़ भाई थावरेंचा अर्ज बाद ठरला हे खरे;परंतु सभापती निवडीत त्यांची भूमिका काय असेल? हे सांगणे तूर्त कठीण बनले आहे़ एकनाथ आव्हाड यांच्या पत्नी गयाबाई या राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत़ माजलगावचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारातून एकनाथ आव्हाडांनी अंग काढून घेतले आहे़ अशा स्थितीत गयाबाई आव्हाड यांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे़ त्यामुळे दोन्ही पक्षाची चिंता वाढली आहे़
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या खुर्चीत विजयसिंह पंडित आहेत़ त्यामुळे ‘रिमोट’ आ़ अमरसिंह पंडित यांच्याकडे आहे़
४सभापतीपदे राखण्यासाठी आ़ पंडित जोर लावतील़
४युतीकडूनही तसे प्रयत्न होऊ शकतात़ विद्यमान सभापती संदीप क्षीरसागर, युद्धाजित पंडित यांना पुन्हा संधी मिळू शकते़
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी युती, आघाडीने चांगलाच जोर लावला होता़
४आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे़
४सभापती, उपसभापती निवडी दोन दिवसांवर येऊन ठेपल्या तरी अद्याप कुठल्याच पक्षाची रणनीती ठरलेली नाही़
४त्यामुळे सभापती निवडीत कोण कोणाला भारी ठरतो ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे़