उद्योजकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:29+5:302021-02-05T04:11:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : अर्थसंकल्पाचे अवलोकन केल्यानंतर उद्योजकांपैकी काहींच्या मते आजचा अर्थसंकल्प संतुलित आहे, तर काहींच्या मते या ...

Entrepreneurs 'some happiness, some sorrow' | उद्योजकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’

उद्योजकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : अर्थसंकल्पाचे अवलोकन केल्यानंतर उद्योजकांपैकी काहींच्या मते आजचा अर्थसंकल्प संतुलित आहे, तर काहींच्या मते या अर्थसंकल्पात अनेक बाबी स्पष्ट केलेल्या नाहीत. दहापैकी दहा गुण देणारा हा अर्थसंकल्प नाही. तथापि, या अर्थसंकल्पाबद्दल उद्योजकांचा सूर ‘कही खुशी, कही गम’ असाच दिसून आला.

‘सीएमआयए’ कॉन्फरन्स हॉलमध्ये सोमवारी उद्योजकांच्या ऑनलाईन बजेट अवलोकन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मानद सचिव सतीश लोणीकर, माजी अध्यक्ष गिरीधर संगानेरिया, उद्योजक रिषी बागला, ‘सीआयआय’चे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ‘मासिया’चे अध्यक्ष अभय हंचनाळ व अन्य उद्योजक उपस्थित होते. यावेळी उद्योजकांपैकी मुकुंद कुलकर्णी, कमलेश धूत, अभय हंचनाळ, शिवप्रसाद जाजू, सतीश लोणीकर यांनी चर्चेत भाग घेतला. यापैकी काहींनी अतिशय सकारात्मक अर्थसंकल्प असल्याची भावना व्यक्त केली. भारतातील उद्योगांपैकी २० टक्के उद्योग हे महाराष्ट्रात आहेत. या उद्योगांना जेव्हा फायदा देण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा त्याचा वाटा आपोआप महाराष्ट्रालासुद्धा मिळतो. मात्र, असे असताना देशातील २७ शहरांपैकी महाराष्ट्रातील नाशिकचा मेट्रोसाठी समावेश करण्यात आला आहे, ही आनंदाची बाब असली, तरी तुलनेने औरंगाबादचा त्यात समावेश नाही, ही दु:खद बाब आहे. नाशिक आणि औरंगाबादची तुलना केली, तर औरंगाबादचे विकासाच्या दृष्टीने असलेले सामर्थ्य मोठे आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे ‘एमएसएमई’ला चालना मिळाली आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे ‘एमएसएमई’ क्षेत्र आणि पायाभूत सुविधांची रचना बरीच वाढेल. स्टार्टअपचे सर्व फायदे एक वर्षासाठी वाढवलेले आहेत. आजवर आयकरासंदर्भातील सहा वर्षे जुन्या त्रुटींची चौकशी आयकर विभाग करत होता. आता ही मर्यादा तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे. कोविड टॅक्स लावण्याची भीती होती. पण, सरकारने सरकारी मालमत्ता आणि कंपन्यांच्या विक्रीतून भांडवल उभारणीला प्राधान्य दिल्याचे दिसते. ही बाब स्वागतार्ह आहे, असा सूर उद्योजकांमधून दिसून आला.

कॅप्शन-

‘सीएमआयए’कडून आयोजित ‘लाईव्ह बजेट’ सत्रात मुकुंद कुलकर्णी, रिषी बागला, कमलेश धूत, सतीश लोणीकर, अभय हंचनाळ आदी उद्योजक सहभागी झाले हाेते.

Web Title: Entrepreneurs 'some happiness, some sorrow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.