उद्योजक संघटनांतर्फे पोलीस आयुक्तासह अधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:05 IST2021-06-18T04:05:01+5:302021-06-18T04:05:01+5:30

वाळूज महानगर : कोरोनाच्या संकटकाळात उद्योग सुरू ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने उद्योजकांना मदत केली होती. या मदतीमुळे उद्योजक संघटनांच्या ...

Entrepreneurs' Association felicitates officers including Commissioner of Police | उद्योजक संघटनांतर्फे पोलीस आयुक्तासह अधिकाऱ्यांचा सत्कार

उद्योजक संघटनांतर्फे पोलीस आयुक्तासह अधिकाऱ्यांचा सत्कार

वाळूज महानगर : कोरोनाच्या संकटकाळात उद्योग सुरू ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने उद्योजकांना मदत केली होती. या मदतीमुळे उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.१७) वाळूजच्या मसिआ सभागृहात पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करीत कृतज्ञता व्यक्त केली.

मसिआ, सीएमआयए, सीआयआय व औरंगाबाद फर्स्ट या उद्योजक संघटनांच्यावतीने वाळूजच्या मसिआ सभागृहात सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, सहा. पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, सीएआयआयचे मराठवाडा झोन अध्यक्ष रमण अजगावकर, सीएमआयएचे उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रितीश चॅटर्जी आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी कोविड काळात सर्व उद्योजक संघटनांनी उद्योग सुरू ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले. डॉ. निखिल गुप्ता यांनी कोविड काळात उद्योजक संघटनाने नियमाचे पालन करून उद्योग सुरू ठेवण्यास मोलाची कामगिरी बजावल्याचे म्हणाले. उद्योजकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घेऊ व रांजणगावात नवीन पोलीस ठाणे उभारण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अशी ग्वाही दिली. या प्रसंगी सुनील भोसले, अभय हंचनाळ, किरण जगताप, अनिल पाटील, गजानन देशमुख, चेतन राऊत, कमलाकर पाटील, राजेंद्र चौधरी, राहुल मोगले, सुदीप आडतीया, अभिषेक मोदानी, सुरेश खिल्लारे, श्रीराम शिंदे, सर्जेराव साळुंके, अर्जुन गायकवाड, प्रल्हाद गायकवाड, आनंद पाटील, राम भोगले, मुकुंद कुलकर्णी, दुष्यंत आठवले, सचिन देशमुख, रोहन येवले आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळ - वाळूजच्या मसिआ सभागृहात आयोजित कार्यक्रमात उद्योजकांना मार्गदर्शन करतांना पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता. व्यासपीठावर उपायुक्त निकेश खाटमोडे व उद्योजक संघटनांचे पदाधिकारी.

फोटो क्रमांक- मसिआ १/२/३

--------------------

Web Title: Entrepreneurs' Association felicitates officers including Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.