शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गुरू गणेशलाल पुण्यतिथी सोहळा उत्साहात

By admin | Updated: February 9, 2016 00:23 IST

जालना : प.पू. गुरू गणेशलालजी म.सा. यांच्या अनेक आत्मगुणांपैकी एका जरी गुणाचे आचरण केल्यास जीवन सफल होईल, असा हितोपदेश प.पू. नमिताजी म.सा. यांनी दिला.

जालना : प.पू. गुरू गणेशलालजी म.सा. यांच्या अनेक आत्मगुणांपैकी एका जरी गुणाचे आचरण केल्यास जीवन सफल होईल, असा हितोपदेश प.पू. नमिताजी म.सा. यांनी दिला. कर्नाटक गजकेसरी घोर तपस्वी प.पू. गणेशलालजी म.सा. यांचा ५४ वा पुण्यतिथी सोहळा सोमवारी अपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी नमिताजी बोलत होत्या. सोहळ्यानिमित्त देशभरातून सुमारे ४० हजार भाविक दर्शनासाठी आले होते. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाने यासाठी जय्यत जयारी केली होती. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी सकाळी साडेसात वाजता बाहेरगावाहून पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांची शोभायात्रा शहरातून विविध ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली. शोभायात्रेत अनेक देखावेही सादर करण्यात आले. शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. सकाळी साडेआठ वाजता श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेशकुमार सकलेच्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी सव्वानऊ वाजता गुरू गणेश सभामंडपम येथे गुरू गुणगान सभेचा मंगलाचरणद्वारे प्रारंभ झाला. कार्यक्रमासाठी आलेल्या ६० पेक्षा अधिक साधू-संतांनी मार्गदर्शन केले. प.पू. नमिताजी म.सा. यांनी गुरूदेव गणेशलालजी म.सा. यांच्या अनेक आत्मगुणांपैकी एखादा जरी गुण आम्ही घेतला तर संपूर्ण जीवन सफल होईल. लोकांनी धर्मकार्यासाठी दान करण्याचे आवानही त्यांनी यावेळी केले. प.पू. प्रशांतकंवरजी म.सा. म्हणाल्या ज्या प्रमाणे आकाशातील तारे मोजणे कठीण आहे. त्या प्रमाणेच गुरूदेवांचे अनेक गुणांचे वर्णन करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. वैराग्यवती हर्षा मकवाना यांनी गुरूदेवांच्या विविध विचारांवर प्रकाश टाकला. प.पू.कीर्तीमुनीजी म.सा. यांनी आपल्या वेदनांचे, कष्टाचे निवाराण करण्यासाठी गुरूस्मरण जरूरी असल्याचे सांगितले.तत्पूर्वी आ. अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. चैनसुख संचेती, माजी आ. कैलास गोरंट्याल यांचा श्रावक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आ. खोतकर म्हणाले, की जैन समाजाने देशाला शांतीचा संदेश दिला आहे. देशाच्या उन्नतीमध्ये या समाजाचे योगदान मोठे असल्याचे सांगितले. आ. टोपे म्हणाले, गुरूदेवांच्या तप, साधना, जप यांचे जीवन आचरण केल्यामुळे जीवनात सार्थकता येते असल्याचे सांगितले. आ. संचेती यांनी समाजाने दातृत्वभाव ठेवून इतरांना मदत करण्याचे आवाहन केले. माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी श्रावक संघाला योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्रावक संघाचे महामंत्री स्वरूपचंद ललवाणी यांनी प्रस्तविक करताना सांगितले की, श्रावक संघाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गोशाळेचा विकास करण्यासाठी दानशुरांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष सुरेशकुमार सकलेच्या यात्रेकरूंसाठी आणखी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. श्रावक संघाला सर्वांचे सहकार्य असल्याने ते कार्य प्रगतीकडे जात असल्याचे सांगितले. प.पू. सुशीलकंवरजी म.सा. यांनी श्रावकांना गुरूदेवांच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन केले. प.पू. चैतन्यश्रीजी म.सा. यांनी गुरूस्तवन प्रस्तुत केले. प.पू. प्रतिभाकंवरजी म.सा. यांनी जालना श्रावक संघामार्फत उत्कृष्ट कार्य होत असल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांची प्रशंसा केली. त्यांनी उपस्थितांना सांप्रदायवादात न पडता एकजूट राहण्याचे आवाहन केले. गुरू गणेश संघ नावाने देशपातळीवरील संघ स्थापन करावा, अशी कल्पना मांडली. प.पू. जोत्स्ना म.सा. यांनी श्रावकांना प्रतिक्रमणाच्या संदर्भात होणाऱ्या प्रचारापासून दूर राहण्याची सूचना केली. प.पू. रत्नज्योतीजी म.सा. यांनी गुरूदेवाच्या कठीण तप आराधनेची माहिती दिली. प.पू. जितेंद्रमुनीजी म.सा. यांनी मोक्षमार्गावर चालण्यासाठी माववाने तपस्या, निर्विकारता, धर्म, गुरूविषयी आदरभाव ठेवल्याने आत्म्याचा उद्धार होईल असे सांगितले. महान बनल्यावरही मन लहान बालकासमान ठेवण्याची सूचना त्यांनी केली. प.पू. विवेकमुनी म.सा. यांनी महाश्रमण उपाधीने आणि प.पू. प्रकाशकंवरजी म.सा.यांना महाराष्ट्र उपप्रवर्तिनी उपाधीने सन्मानित करण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादी ठेवलेल्या राजेंद्र मुथा व त्यांच्या परिवाराचा श्रावक संघातर्फे सत्कार करण्यात आला. श्रावक संघाचे सहसचिव कचरूलाल कुंकूलोळ यांनी आभार मानले. मांगलिकने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाषचंद सकलेचा, आनंदकुमार सुराणा, अनिल मुथा, रवींद्र लोढा, दिनेशकुमार बरलोटा, प्रशांत भंडारी, महेंद्रकुमार गादिया, पंकज खिंवसरा, राजेश लुणिया, वीरेंद्रकुमार रुणवाल, वीरेंद्र धोका, सुदेशकुमार सकलेचा, डॉ. धरमचंद गादिया, स्वरूपचंद ललवाणी, कचरूलाल कुंकूलोळ, भरतकुमार गादिया, डॉ. गौततचंद रूणवाल, संजयकुमार मुथा, विजयराज सुराणा, नरेंद्रकुमार लुणिया, सूरजमल मुथा, डॉ. कांतीलाल मांडोत आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)