रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेला इंग्रजीचा बाह्य परीक्षक !

By Admin | Updated: February 4, 2016 00:36 IST2016-02-04T00:31:04+5:302016-02-04T00:36:12+5:30

हणमंत गायकवाड , लातूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावी विज्ञानच्या प्रात्यक्षिक परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला असून, दयानंद

English Examiner for Demonstration of Chemistry! | रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेला इंग्रजीचा बाह्य परीक्षक !

रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेला इंग्रजीचा बाह्य परीक्षक !


हणमंत गायकवाड , लातूर
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावी विज्ञानच्या प्रात्यक्षिक परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला असून, दयानंद विज्ञान महाविद्यालयातील केमिस्ट्रीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाह्य परीक्षक म्हणून इंग्रजी व फिजिक्स विषयाच्या प्राध्यापकाची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रात्यक्षिक परीक्षा घेताना ज्या-त्या विषयांसाठी त्याच विषयाचा प्राध्यापक बाह्य परीक्षक म्हणून नियुक्त केला जातो. दयानंद विज्ञान महाविद्यालयात बोर्डाच्या नियमानुसार प्रात्यक्षिक परीक्षेचा कार्यक्रम १ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत जाहीर करण्यात आला आहे. केमिस्ट्री विषयासाठी एकूण ७ बाह्य परीक्षकांची नावे बोर्डाने दयानंद महाविद्यालयासाठी लेखी कळविली आहेत. बोर्डाने कळविलेल्या या सात बाह्य परीक्षकांपैकी दोघेजण केमिस्ट्री विषयाचे नाहीत. एक इंग्रजी विषयाचा असून, दुसरा भौतिकशास्त्र विषयाचा आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा मात्र केमिस्ट्री विषयाची आहे. बाह्य परीक्षकाशी ‘दयानंद’मधील संबंधितांनी संपर्क केला असता हे दोन बाह्य परीक्षक केमिस्ट्री विषयाचे नसल्याचे निदर्शनास आले आहे. बोर्डाला महाविद्यालय प्रशासनाने ही बाब तात्काळ कळविली असता अन्य पाच बाह्य परीक्षकांकडून परीक्षेचे काम निर्धारित वेळेत करून घेण्याची सूचना केली आहे.

Web Title: English Examiner for Demonstration of Chemistry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.