अभियांत्रिकीचे पेपर आॅनलाईन

By Admin | Updated: December 1, 2014 01:28 IST2014-12-01T01:24:05+5:302014-12-01T01:28:20+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत उद्या सोमवारपासून अभियांत्रिकी विद्याशाखेच्या नापास विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत आहे.

Engineering paper online | अभियांत्रिकीचे पेपर आॅनलाईन

अभियांत्रिकीचे पेपर आॅनलाईन

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत उद्या सोमवारपासून अभियांत्रिकी विद्याशाखेच्या नापास विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेच्या पेपरबद्दल विद्यापीठाने कमालीची दक्षता बाळगली असून आता सर्वच पेपर एक तास अगोदर आॅनलाईन पाठविले जाणार आहेत.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील १८ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा होणार आहे. आतापर्यंत परीक्षेच्या दोन दिवस अगोदर सर्वच केंद्रांवर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका विद्यापीठाच्या खास दूतांमार्फत पाठविल्या जात असत. मध्यंतरी परीक्षा विभागातील काही कर्मचारी तसेच पेपर सेटर्स व पेपर सेटर समितीच्या चेअरमनच्या दुर्लक्षामुळे काही अभ्यासक्रमांच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्या होत्या. या चुका टाळण्यासाठी विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या नापास तसेच नवीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये आॅनलाईन पेपर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सकाळी १० वाजेपासून अभियांत्रिकीच्या नापास विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे. तत्पूर्वी, सकाळी ८ वाजताच वेबसाईटची लिंक सुरू केली जाईल.

Web Title: Engineering paper online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.