पोटाला चाकू लावून अभियंत्याला तीन जणांनी लुटले

By | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:58+5:302020-12-02T04:05:58+5:30

तक्रारदार राधेश्याम रतनलाल कुमावत (रा. गादिया विहार) पालघर जिल्ह्यात महावितरण कंपनीत अभियंता आहेत. रविवारी रात्री ते पालघर येथे औरंगाबादला ...

The engineer was stabbed in the stomach by three men | पोटाला चाकू लावून अभियंत्याला तीन जणांनी लुटले

पोटाला चाकू लावून अभियंत्याला तीन जणांनी लुटले

तक्रारदार राधेश्याम रतनलाल कुमावत (रा. गादिया विहार) पालघर जिल्ह्यात महावितरण कंपनीत अभियंता आहेत. रविवारी रात्री ते पालघर येथे औरंगाबादला आले. महावीर चौकात बसमधून उतरल्यावर ते अमर चौकापर्यंत रिक्षाने आले. तेथून ते काल्डा कॉर्नरमार्गे गादिया विहारकडे पायी जात होते. रात्री ३:४० वाजेच्या सुमारास मोटरसायकल ट्रीपल सीट आलेल्या तीन अनोळखी गुंडांनी त्यांना अडविले. एकाने त्यांचे दोन्ही हात पकडले तर दुसऱ्या त्यांच्या पोटाला चाकू लावून पैशाची मागणी केली. तिसऱ्या आरोपीने त्यांच्या खिशातील रोख चार हजार रुपये आणि मोबाइल काढून घेतला. यावेळी कुमावत यांनी आरडाओरड करताच आरोपी दुचाकीवर बसून फरार झाले. या घटनेनंतर त्यांनी जवाहरनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

Web Title: The engineer was stabbed in the stomach by three men