एकाच संस्थेवर अभियंत्यांची मेहेरनजर

By Admin | Updated: November 18, 2015 00:37 IST2015-11-18T00:27:02+5:302015-11-18T00:37:24+5:30

गंगाराम आढाव , जालना सार्वजनिक बांधकाम विभागातील अजब कारभाराचा सर्वाधिक फटका हा इमाने इतबारे काम करणाऱ्या कंत्राटदारांना बसला आहे. ज्यांनी कामे केली

Engineer Meheranzar on one organization | एकाच संस्थेवर अभियंत्यांची मेहेरनजर

एकाच संस्थेवर अभियंत्यांची मेहेरनजर


गंगाराम आढाव , जालना
सार्वजनिक बांधकाम विभागातील अजब कारभाराचा सर्वाधिक फटका हा इमाने इतबारे काम करणाऱ्या कंत्राटदारांना बसला आहे. ज्यांनी कामे केली त्यांच्याच कामात तांत्रिक त्रुटी काढण्यात येऊन देयके रखडून ठेवली जात आहे. ज्यांनी काम न करता, तसेच शिफारशी पत्रापेक्षा अधिकचे देयके सादर केली अशांची मात्र बिनदिक्कतपणे बिले काढण्यात येत असल्याची चर्चा आहे. दरम्यान बिलांमध्ये संबंधित अभियंत्यांची हिस्सेदारी असल्यामुळे शिफारस पत्रावरील रकमेच्या चारपटीने रक्कम टाकून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी एकाच संस्थेवर मेहरनजर दाखविण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल पाचपट अधिकचे वर्कआर्डर हे एकाच संस्थेला दिले. शंकर पार्वती मजूर सहकारी संस्था म. जालना असे या संस्थेचे नाव असून, या संस्थेवरच एवढी मेहरबानी का दाखविण्यात आली. याप्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, संबंधित अभियंत्यांनी त्या कामांमध्ये हिस्सेदारी असल्यामुळेच पाचपटीने कामांच्या रकमा वाढवून सुमारे ७५ लाखांची तफावत करून ती रक्कमेचा बोजा शासनाच्या तिजोरीवर टाकला असल्याची चर्चा आहे.
शंकरपार्वती या मजूर सहकारी संस्थेवर मेहरबान होऊन जालना सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी तसेच इतर अधिकाऱ्यांनी मनमानीपणे कामांच्या रकमा वाढविल्या आहेत. २ लाखांच्या कामांसाठी ९ लाख ९८ हजार ३० रूपयांचे वर्कआॅर्डर देण्यात आले. अशा प्रमाणे एकूण २५ लाख ३९ हजार खर्चाच्या दहा कामांची एकूण शिफारस रकम असताना त्यात चार ते पाचपट रक्कम वाढवून एकूण ९९ लाख ७३ हजार १५८ रूपयांच्या कामांचे वर्कआॅर्डर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
पडताळणीत हे सर्व स्पष्ट होऊन तसा अहवाल कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता तसेच मुख्य अभियंता औरंगाबाद यांच्याकडे जाऊन ही त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अभियंते व इतर अधिकाऱ्यांचे या कामांत संगनमत असल्याचे असल्याचे दिसून येत आहे. याकामांची सखोल चौकशी करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
जालना सार्वजनिक बांधकाम विभागाने शंकर पार्वती मजूर संस्थेला मिळालेल्या शिफारस पत्रावरून चार ते पट अधिकची रक्कम वाढवून वर्कआॅर्डर तर दिले. शिवाय इतर म्हणजे जयकिसान मजूर सहकारी संस्था, पिरपिंपळगाव या संस्थेला मिळालेले नर्सिंग कॉलेज दुरूस्तीचे ५ लाखांचे शिफारस पत्रावर १० लाखांचे व महिला रूग्णालयातील सेनेटरी अ‍ॅरेजमेंट कामांचे ४ लाखांऐवजी ९ लाख ९९ हजार ५० रूपयांचे वर्कआॅर्डर देवून ते काम जयकिसान या संस्थेला न देता कामांचे वाढीव वर्कआॅर्डर शंकरपार्वती संस्थेला देण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Web Title: Engineer Meheranzar on one organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.