पैठण रोडवर अपघातात अभियंत्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:33 IST2017-11-10T00:33:49+5:302017-11-10T00:33:53+5:30
अर्धवट काम आणि खराब झालेल्या पैठण रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या वाहन अपघातात तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. सचिन सदाशिव देशपांडे (३०, रा. तिरुपती विहार कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे.

पैठण रोडवर अपघातात अभियंत्याचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अर्धवट काम आणि खराब झालेल्या पैठण रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या वाहन अपघातात तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. सचिन सदाशिव देशपांडे (३०, रा. तिरुपती विहार कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे.
याविषयी सातारा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष भोसले म्हणाले की, पैठण रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता एकेरी आहे. बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सचिन हा पत्नी वैष्णवीसह शहरातून कांचनवाडीकडे दुचाकीने येत होता. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात सचिन गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला तर त्यांची पत्नी बेशुद्ध पडली. या अपघातानंतर कांचनवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सचिन यास तपासून मृत घोषित केले. खराब रस्ता आणि महिन्यापासून अर्धवट सुरू असलेल्या कामामुळे आमच्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप सचिनच्या कुटुंबियांनी केला. सचिन एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून काम करीत होता. सचिनचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पैठण रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे. आणखी किती जणाचे बळी घेणार आहे, असा संतप्त सवाल सचिनच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी सातारा ठाण्यात नोंद करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव काकडे तपास करीत आहेत.