लाच घेताना अभियंता चतुर्भूज
By Admin | Updated: March 18, 2015 00:20 IST2015-03-18T00:02:10+5:302015-03-18T00:20:36+5:30
बीड: शेतातील विहिरीवर विद्युत जोडणी देण्यासाठी एका खाजगी इसमाद्वारे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मानसिंग जाधव यांना

लाच घेताना अभियंता चतुर्भूज
बीड: शेतातील विहिरीवर विद्युत जोडणी देण्यासाठी एका खाजगी इसमाद्वारे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मानसिंग जाधव यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जालना रोड येथील कार्यालयात पकडले.
बीड तालुक्यातील नाळवंडी येथील शाम रूपा राठोड यांनी शेतातील विहिरीवर मोटार बसविण्यासाठी कोटेशन भरले होते. वीज जोडणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता जाधव यांनी त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. राठोड यांनी याबाबतची तक्रार एसीबीकडे केली. त्यानुसार जालनारोडवरील महावितरणच्या कार्यालयात सापळा रचला. जाधव याने सदरची लाच रक्कम तक्रारदार यांना मागितली. व खाजगी इसम आकाश आशोक भालशंकर यांच्याकडे देण्यास सांगितले. पाच हजारांची लाच स्वीकारली असता जाधव व भालशंकर यांना एसीबीने पकडले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)