शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
4
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
6
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
7
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
8
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
9
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
10
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
11
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
12
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
13
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
14
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
15
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
16
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
17
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
18
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
19
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
20
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."

पुत्र निघाला गुंडा; इंजिनीअरने कर्ज फेडण्यासाठी मित्रांमार्फत फोडले स्वतःचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 16:50 IST

सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे पावणे दोन लाखाचा ऐवज चोरीला गेला

ठळक मुद्देघरमालक तरुणासह त्याच्या दोन मित्रांना अटक 

औरंगाबाद: कर्जबाजारी झालेल्या तरुणाने कट रचून चक्क दोन मित्रांकडून स्वतः चे घर फोडल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी गारखेडा परिसरातील रेणुकानगरात घडली. या घटनेत सुमारे पावणे दोन लाखाचे दागिने पळविणाऱ्या तरुणासह त्याच्या मित्रांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. घरमालक दिनेश देवीदास शिंदे त्याचे मित्र सुमीत गुलाबराव प्रसाद आणि कृष्णा साहेबराव लघाने (रा. रेणूकानगर ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी दिनेश अभियांत्रिकीचे तर सुमीत बीएसस्सीचे शिक्षण घेत आहे. 

पोलिसांनी सांगितले की , रेणूकानगरातील रहिवासी उषा देविदास शिंदे या दिवाळीनिमित्त पतीसह शिंदेफळ(ता. सिल्लोड) येथे गेल्या होत्या. घरी असलेला त्यांचा एकुलता मुलगा दिनेश हा १५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून गावी गेला. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास त्यांचे भाडेकरू रवी बनकर यांनी शिंदे यांना फोन करून तुमच्या घराचे दार उघडे असल्याचे कळविले. चोरी झाल्याच्या संशयाने उषा यांनी दिनेशसह तातडीने औरंगाबादला गाठले. ते घरी आले तेव्हा घराच्या दाराचा कडीकोंडा तुटलेला होता शिवाय आतील कपाट उचकटून सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. लोखंडी ड्रममध्ये लपवून ठेवलेली सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे पावणे दोन लाखाचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उषा यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे , हवालदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव, राजेश यदमळ, कल्याण निकम, जालिंदर मांटे , दिपक जाधव , आणि अजय कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान उषा यांचा मुलगा दिनेश हा व्यसनाधिन असून तो कर्जबाजारी असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयावरून दिनेशची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. 

संशय बळावताच पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुंह्याची कबुली देत कर्ज फेडण्यासाठी सुमित आणि कृष्णाकडून ही चोरी करून घेतल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी सुमीत आणि कृष्णाला उचलले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरलेले दागिने एका वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवून ८५ हजार रुपये कर्ज घेतल्याचे सांगितले. तर कृष्णाच्या घरातून ६७ हजार रुपये जप्त केले . मात्र लॉकडाउन कालावधीत त्याचे काम सुटले त्याला दारूचे व्यसन आहे . यात तो कर्जबाजारी झाल्याने काही दिवसांपूर्वी काही तरुण त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी आले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने मित्रांकडून स्वतःच्या घरातच चोरी करण्याचा प्लॅन केला आणि तडीस नेला.

असा झाला भांडाफोड शिंदे यांच्या गेटचे कुलूप गायब होते. शिवाय कुलूप तोडल्याच्या खूना दिसत नव्हत्या. यामुळे ही चोरी ओळखीच्या व्यक्तीने केली असावी असा संशय होता. शिंदे दांपत्याने ज्या लोखंडी ड्रममध्ये दोन उशाच्या आत कापडी पिशवीत दागिने लपवून ठेवले होते . तीच पिशवी चोरांनी नेली होती. पोलिसांनी दिनेशकडे विचारपूस केली तेव्हा तो घाबरून गेल्याचे दिसल्याने पोलिसांना संशय आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीAurangabadऔरंगाबाद