एन्ड्यूरन्स, व्हेरॉकवर ठपका
By Admin | Updated: October 27, 2016 00:59 IST2016-10-27T00:47:05+5:302016-10-27T00:59:47+5:30
औरंगाबाद : प्रक्रिया न करता सांडपाण्याची विल्हेवाट लावून भूजल प्रदूषित केल्याबद्दल एन्ड्यूरन्स, व्हेरॉकवर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

एन्ड्यूरन्स, व्हेरॉकवर ठपका
औरंगाबाद : प्रक्रिया न करता सांडपाण्याची विल्हेवाट लावून भूजल प्रदूषित केल्याबद्दल एन्ड्यूरन्स, व्हेरॉकवर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय हरित लवादात सुरूअसणाऱ्या प्रकरणात या कंपन्यांना प्रतिवादी करण्यात आले असून, येत्या ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
वाळूज औद्योेगिक वसाहतीतील काही उद्योगांकडून उत्पादन प्रक्रियेतील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नव्हती. या सांडपाण्यामुळे परिसरातील भूजल प्रदूषित होऊन पर्यावरणाची हानी होत असल्याची याचिका रघुनाथ लोहकरे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केली होती. याचिकेत ३४ उद्योगांना प्रतिवादी करण्यात आले होते. भूजल प्रदूषित करणाऱ्या सर्वच उद्योगांचा शोध घेण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नेरी), भूजल सर्वेक्षण यंत्रणा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी २०१५ यावर्षी सर्वेक्षण करून भूजल प्रदूषित करणाऱ्या उद्योगांचा शोध घेतला होता.
भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी वाळूज परिसरात १९ कोटी रुपये खर्च करून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे.
४भूजल प्रदूषित करणाऱ्या उद्योगांनी दंड म्हणून या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य करावे, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रयत्न सुरूआहेत.
त्यासाठी काही उद्योगांनी आर्थिक सहाय्य करण्याचे मान्य केले आहे, तर आमच्यामुळे भूजल प्रदूषित होत नाही, असा दावा करून काहींनी दंड भरण्यास असमर्थता दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.