सखी मंच नोंदणीची प्रतीक्षा संपणार

By Admin | Updated: February 11, 2015 00:26 IST2015-02-11T00:18:54+5:302015-02-11T00:26:30+5:30

जालना : लोकमत सखी मंचच्या सदस्य होऊ इच्छिणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपत आहे. सखी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या रंगीबेरंगी कार्यक्रमाचा आस्वाद

End of waiting for Sakhi platform registration | सखी मंच नोंदणीची प्रतीक्षा संपणार

सखी मंच नोंदणीची प्रतीक्षा संपणार


जालना : लोकमत सखी मंचच्या सदस्य होऊ इच्छिणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपत आहे. सखी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या रंगीबेरंगी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सखी मंच सदस्य होणे आवश्यक आहे. केवळ सदस्य नसल्यामुळे ही सुवर्ण संधी हातून निसटू शकते. त्यामुळे ही संधी निसटू नये यासाठी सदस्य होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी नोंदणीच्या तारखेकडे लक्ष असू द्यावे. तारीख माहित करण्यासाठी फार काहीच करावयाचे नाही. तर फक्त लोकमतचे नियमीत वाचन करावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
सदस्य झाल्यावर सखींना विविध बक्षीसांची लयलूटही करता येणार आहे.
सखी मंच गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या लाडक्या सखींसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, बौध्दिक व खाद्य संस्कृतीशी निगडित अशा कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करत असते. तुम्हीही या बहारदार मेजवानीचा अनुभव घेऊ शकता. २०१५ च्या सदस्य नोंदणीच्या वेळी नावनोंदणी करुन तुम्हालाही सखी मंचचे सदस्य होता येईल. यासाठी सदस्य नोंदणीच्या तारखेकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे.


सखी मंच या नविन वर्षाची पर्वणी म्हणून जालन्यामध्ये पहिल्यांदाच घेऊन येत आहे, ‘मिनीस्टर नव्हे होम मिनीस्टर’ या गंमतीदार खेळात सहभागी व्हायची सुवर्ण संधी.....
४हा ‘मिनीस्टर नव्हे होम मिनीस्टर’ हा कार्यक्रम आपल्या भागात सादर करण्यासाठी इच्छुक असलेल्या सोसायटी, कॉलनीतील व्यक्तिनी आम्हास आपल्या भागात बोलविण्यासाठी ९२७१७१३२०२, ९९२२००४४०७ या क्रमांकावर फोन करुन किमान ५० कुटुंबे जमविल्यास हा कार्यक्रम आपल्या भागात सादर होवू शकतो. तेव्हा त्वरा करा. लवकरात लवकर आम्हाला फोन करा. व या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. सोबत बक्षीसेही जिंका.
गतवर्षी म्हणजे २०१४ मध्ये सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नटरंगी नार या बहारदार लावणीच्या कार्यक्रमाचा आनंद सखी मंच सदस्यांनी सुरुवातीस लुटला होता. त्यानंतर यारीया व मराठी चित्रपट बालक-पालक या चित्रपटांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सुप्रसिध्द मिमीक्री आर्टिस्ट ज्युनिअर देवानंद यांनी सखी मंच सदस्यांना अनेक गाणे व नकला करुन मनमुराद हसविले. त्यानंतर विनोदी कार्यक्रम ‘राशीच्या संगतीने आयुष्य जगुया गंमतीने’ या राशींवर आधारीत असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
४दिलीप हल्ल्याळ यांचा द्विपात्री प्रयोग ‘हास्य षटकार’ त्यानंतर ‘सरीवर सरी’ हा मराठी व हिंदी गितांनी सजलेला आॅर्केस्ट्रा, त्यानंंतर पुष्कर श्रोत्री यांनी एकाच नाटिकेत सहा वेगवेगळ्या भूमिका साकारत ‘हसवा फसवी’ या नाटकाच्या माध्यमातून सखींना भरपूर हसविले. शेवटी नुकताच प्रदर्शित झालेला आमिरखान अभिनेत ‘पिके’ या चित्रपटाचा आनंदही सखींनी घेतला.

Web Title: End of waiting for Sakhi platform registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.